उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज :- तालुक्याच्या शिवराजपूर येथील रेणुकाबाई उके विद्यालयाचे मुख्याध्यापक ओ.एन लेनगुरे हे नुकतेच नियतवयोमानानुसार सेवानिवृत्त झाले असून त्यांच्या सत्कार समारंभाचा कार्यक्रम रेणुका चॅरिटेबल ट्रस्ट कुरुडचे क्षितिज भाऊ उके यांच्या अध्क्षतेखाली रेणुकाबाई उके विद्यालयात पार पडला.
मुख्याध्यापक ओ.एन लेनगुरे यांनी विद्यालयात असतांना कितीतरी वर्षे सेवा केली.शाळेतून अनेक विद्यार्थी घडविले,शिस्तप्रिय,मनमिळावू स्वभाव तसेच विद्यार्थ्यांप्रती असलेली कळकळ त्यांनी जोपासून नियतवयोमानानुसार सेवानिवृत्त झालेत; असे सत्कार समारंभ प्रसंगी रेणुका चॅरिटेबल ट्रस्ट कुरुडचे क्षितिज भाऊ उके यांनी म्हटले आहे.सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सचिवराऊत,सहसचिव लांडगे, सत्कारमूर्ती सेवानिवृत्त मुख्याध्यापक लेनगुरे,विजय सुखदेवे सेवानिवृत्त मुख्या.,कु वासनिक मॅडम प्रभारी मुख्या.,लाडे मुख्या. कमलेश उके विद्यालय सावंगी,रंगारी,शेंडे, व दोनाडकर आदी उपस्थित होते.सेवानिवृत्त मुखयाध्यापक लेनगुरे यांच्या जीवनकार्याचा आढावा घेवून शुभेच्छा देण्यात आल्या व क्षितिज भाऊ उके तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन लेनगुरे यांचा सत्कार करण्यात आला.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जवंजार तर आभार वाईकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी सुखदेवे,धुरके मॅडम,नूतन मेश्राम मॅडम,प्रमोद राऊत, उमाजी कुथे तसेच श्यामराव शेंडे यांनी सहकार्य केले.

