Monday, August 31, 2026
Homeदेसाईगंजकुरुड येथील आरोपीला ११ मार्च पर्यंत पोलीस कोठडी…..

कुरुड येथील आरोपीला ११ मार्च पर्यंत पोलीस कोठडी…..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

मुख्य संपादक/सत्यवान रामटेके

देसाईगंज(गडचिरोली) :- देसाईगंज तालुक्यातील कुरूड येथील प्रतीक विजय घोडेस्वार याच्या हत्या प्रकरणातील आरोपी विकास जनार्दन बोरकर वय ५० वर्षे रा.कुरुड याला देसाईगंज पोलिसांनी मोठ्या शिताफिने अटक केली.अटक केल्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता; न्यायालयाने त्याला ११ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

कुरूड येथे ९ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास प्रतीक घोडेस्वार याच्या डोक्यावर प्रहार केल्याने  त्याचा मृत्यू झाला.सदर घटनेची माहिती देसाईगंज पोलिसांना मिळताच; अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.हत्या केल्यानंतर अज्ञात आरोपीने कोणताही पुरावा मागे न ठेवल्याने आरोपीचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता; कुरखेडाचे उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र भोसले यांनी देसाईगंजचे पोलिस निरीक्षक अजय जगताप यांच्या नियंत्रणाखाली तपास पथक नेमले.पथकाने प्रकरणाचा कसून तपास करीत संशयित आरोपी विकास बोरकर याला ताब्यात घेतले.चौकशीदरम्यान सुरुवातीला त्याने उडवाउडवीचे उत्तर दिले.मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.त्यानंतर त्याला बुधवारी अटक करण्यात आली. न्यायालयाने आरोपीला ११ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ई-पीक पाहणी नोंद घेणाऱ्यांकडून पैश्याची मागणी; तहसील कार्यालयात करा तक्रार..

उद्रेक न्युज वृत्त :-शासनाने 'खरीप हंगाम-२०२६' साठी ई-पीक पाहणीच्या कार्यपद्धतीत बदल करून गावनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या पीक पाहणी सहाय्यकांमार्फत पिकांची नोंद करण्यात येत आहे.विशेष म्हणजे,शासकीय योजना,पीक कर्ज...

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

तब्बल २५० हून अधिक गावांचा ‘कुष्ठभयमुक्त व भेदभावमुक्त ग्राम’ संकल्प.. – कुष्ठांतेयांच्या प्रतिष्ठेसाठी ग्रामसभेत सर्वानुमते ठराव पारित..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-कुष्ठरोगाविषयी असलेली भीती,गैरसमज, कलंक आणि सामाजिक भेदभाव दूर करून कुष्ठांतेयांना सन्मानाने व प्रतिष्ठेने जगता यावे,या उद्देशाने चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया,पालघर व नंदुरबार जिल्ह्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!