Sunday, May 31, 2026
Homeबीडखेळता-खेळता झोक्याने घेतला चिमुकलीचा जीव..

खेळता-खेळता झोक्याने घेतला चिमुकलीचा जीव..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
बीड :-लहान बहिणीसह झोक्याचा खेळ खेळत असतांनाच अचानकपणे गळ्याला फास आवळून एका नऊ वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,मंगळवार ३१ मार्च रोजी सकाळच्या सुमारास बीड जिल्ह्याच्या माजलगाव शहरात घडली.वृंदा समीर रुद्रवार वय ९ वर्षे,रा.खंडोबा मैदान परिसर,माजलगाव,जि.बीड असे मृत पावलेल्या चिमुकलीचे नाव असून ती ईगलवुड शाळेत इयत्ता दुसरीत शिकत होती.अचानक घडलेल्या घटनेने रुद्रवार परिवारावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
नऊ वर्षीय वृंदा आज सकाळच्या सुमारास तिच्या लहान बहिणीसह घरातील वरच्या मजल्यावर असलेल्या झोक्यावर(दोरीचा पाळणा)खेळत होती.दरम्यान,खुर्चीवर चढून झोका हातात घेत असतांना खुर्ची खाली पडली आणि वृंदाला झोक्याचा गळफास बसला.गळफास बसताच वृंदाचा जागीच मृत्यू झाला.बराच वेळ होऊनही मुलगी जेवण करण्यासाठी खाली कां आली नाही? हे पाहण्यासाठी तिची आई वरच्या मजल्यावर गेली असता मुलगी गळफास बसलेल्या अवस्थेत दिसून आली. मुलीला पाहून आईने एकच आक्रोश केला.आवाज ऐकून आजी,आजोबा व  वडिलांनी धाव घेत तात्काळ वृंदाला रुग्णालयात नेले.तोपर्यंत खूप उशीर झाला होता. तपासणीअंती डॉक्टरांनी वृंदाला मृत घोषित केले. चिमुकलीच्या दुर्दैवी मृत्यूने रुद्रवार कुटुंबियांवर मोठा आघात झाला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विवाहित महिलेचा गळा चिरून हत्या करणारा आरोपी अटकेत.. – क्षुल्लकशा कारणावरून हत्या; बालपणापासून होते प्रेमप्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातील वेकोलिच्या धोपटाळा कामगार वसाहतीत एका विवाहित महिलेची धारदार शस्त्राने गळा चिरून निघृण हत्या करण्यात आल्याची थरारक घटना शुक्रवार...

धानोरा व एटापल्ली तालुक्यात २० हजार धुररहित चुलींचे वितरण.. -दरवर्षी ४१ हजार टनांहून अधिक जळाऊ लाकडाची होणार बचत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शन व पुढाकारातून गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा व एटापल्ली या दुर्गम,आदिवासी तालुक्यांमध्ये राबविण्यात आलेल्या धुररहित चुल उपक्रमाला उल्लेखनीय...

चार दिवसांत उष्माघाताचे तब्बल १८ जण बळी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सध्या नवतपाचे दिवस सुरू आहेत.२५ मे २०२६ पासून सुरू झालेली सूर्याची दाहकता २ जून २०२६ पर्यंत राहणार आहे.अश्यातच भयंकर तापणाऱ्या नवतप्याने...

हाताची दोन बोटे दाखवून सेल्फी काढत असाल तर सावधान..!

उद्रेक न्युज वृत्त :-डिजिटल युगात सायबर गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होतांना दिसून येत आहे.काही कालावधीपासून डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून नागरिकांची लाखो रुपयांपासून ते कोट्यवधी रुपयांची फसवणूक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!