Tuesday, October 6, 2026
Homeकुरखेडाकुरखेडा तालुक्यात अवैधरीत्या गौण खनिजांची लूटमार..!- शासनास लाखोंचा चुना; महसूल प्रशासन गाढ...

कुरखेडा तालुक्यात अवैधरीत्या गौण खनिजांची लूटमार..!- शासनास लाखोंचा चुना; महसूल प्रशासन गाढ झोपेत

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

कुरखेडा :- तालुक्यात अवैधरीत्या गौण खनिजांची छुप्या पद्धतीने व खुलेआम लूटमार करून शासनास लाखोंचा चुना लावल्या जात असूनही कुरखेडा महसूल प्रशासन एवढे गाढ झोपेत कसे? असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात असल्याने कुठेतरी भले मोठे पाणी मुरत असावे; असे तर्क-वीतर्कांना उधाण आले आहे.

सध्या स्थितीत सगळीकडेच रेती घाटांची लिलाव प्रक्रिया रखडली असल्याने अवैधरीत्या रेती चोरीचे प्रमाण अधिक वाढले आहेत.अशातच कुरखेडा तालुक्यातील सती नदीतून अवैधरीत्या रेती चोरीचा सपाटा रेती तस्करांनी चालवला असल्याने सर्वांचे खिसे गरम करून ‘माल सुतावो’ अशी भूमिका तर घेतली जात नसावी ना? अशी शंका बळावली जात आहे. तालुक्यातील आंधळी-नवरगाव,खरमतटोला, कुंभीटोला व इतर ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर रेती तस्करीचे प्रमाण वाढले आहे.रेती चोरीसाठी सती नदी तस्करांसाठी वरदान ठरली आहे.रात्रीच्या अंधारात व दिवसा ढवळ्या ट्रॅक्टर व इतर साधनांद्वारे मोठ्या प्रमाणावर धूमधडाक्यात रेतीचा अवैध उपसा करून शासनाच्या महसुलाचे सोक्ष-मोक्ष केले जात आहे.

रेती बरोबरच काही कंत्राटदार मुरुमाची रॉयल्टी १०० ब्रास तर उत्खनन ३०० ब्रास व त्याही पलीकडे उत्खनन करून शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारीत आहेत.मुरुमाच्या वाहतूक परवाना केवळ देखाव्या करीता वापरल्या जात असल्याने वाहतूक परवाना एक तर प्रत्यक्ष वाहतूक अनेक असे होत आहे.त्यामुळे ‘कंत्राटदारांची चांदी तर महसूल विभागाची वांदी’ होऊनही खालच्या स्तरापासून वरच्या स्तरापर्यंत चुप्पी साधून गमती-जमतीचा खेळ खेळला जात असल्याचे जनता जनार्दनातून हळूच दबक्या आवाजात बोलले जाते आहे.

अवैध गौण खनिजांची लूटमार होऊ देण्यास जबाबदार कोण?असा प्रश्न उपस्थित केला जात असल्याने यावर आळा बसणार की नाही; याकडे कुरखेडा शहर व तालुक्यातील नागरिकांच्या नजरा लागलेल्या दिसून येत आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नैनपूर तलावावर विद्यार्थ्यांनी घेतला पक्षी निरीक्षणाचा अनोखा अनुभव.. -वन्यजीव सप्ताहाच्या सहाव्या दिवशी देसाईगंज वनविभागाचा स्तुत्य उपक्रम..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज :-पुस्तकातील निसर्ग शिकण्यापेक्षा निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन त्याला प्रत्यक्ष अनुभवणे अधिक प्रभावी असते,याचा सुंदर प्रत्यय वन्यजीव सप्ताह २०२६ अंतर्गत सहाव्या दिवशी नैनपूर...

नितेश कराळे मास्तरांनी नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भरला उमेदवारी अर्ज..

उद्रेक न्युज वृत्त :-वर्ध्यातील 'फिनिक्स अकॅडमी'चे संचालक,सामाजिक कार्यकर्ते तथा विदर्भातील वऱ्हाडी भाषेत स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करणारे शिक्षक म्हणून प्रसिद्ध असलेले कराळे मास्तर अर्थात नितेश...

मतदार यादी पुनरीक्षण; आता बीएलओ घरी जाऊन स्वीकारणार नोटीस प्राप्त मतदारांची कागदपत्रे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जुळवणी न झालेल्या किंवा जुळवणीत तार्किक विसंगती असलेल्या मतदारांना सुनावणीची नोटीस प्राप्त झाली असली,तरी निवडणूक...

बँकांनी कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांना तगादा लावून नये; जीवाचे बरे वाईट केल्यास यंत्रणेला जबाबदार धरले जाईल- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने सरकारकडून दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना पीक कर्जवसुलीपासून दिलासा देण्यात आला आहे.अश्यातच काही बँका,पतसंस्था वा इतर वित्तसंस्था शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!