- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-राज्याचे माजी विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांची नुकतीच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन सोहळा तसेच आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोहळा व आरमोरी विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्ता मेळावा उद्या शुक्रवार २१ फेब्रुवारीला देसाईगंज शहरात आयोजित करण्यात आला असून सदर सोहळ्यास जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सदर जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोहळा उद्या शुक्रवारी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास दहीकर कॉम्प्लेक्स,कुरखेडा रोड,देसाईगंज(वडसा)या ठिकाणी विविध मान्यवर,पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडणार असून राज्याचे माजी विरोधी पक्षनेते,काँग्रेस महाराष्ट्र विधिमंडळ पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांचा अभिनंदन सोहळा व कार्यकर्ता मेळावा दुपारी २ वाजेच्या सुमारास हटवार मंगल कार्यालय, देसाईगंज (वडसा)या ठिकाणी पार पडणार आहे.सदर सोहळ्यास आरमोरी विधानसभा क्षेत्रासह जिल्ह्यातील विविध मान्यवर,पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांचा सहभाग असणार आहे.
- Advertisement -

