- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-लाखांदूर तालुक्याच्या सरांडी (बु)येथील रहिवासी असलेल्या २२ वर्षीय युवकाचा नागपूरच्या औषध तयार करणाऱ्या कंपनीमध्ये काम करीत असतांना अंगावर रॅक कोसळल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.कृष्णा अभिमान बेदरे वय २२ वर्षे असे मृत पावलेल्या युवकाचे नाव आहे.सदरची घटना काल १९ फेब्रुवारी रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली.कृष्णा मागील दोन वर्षांपासून नागपूर येथील एका मेडिसिन कंपनीमध्ये काम करीत होता.काल १९ फेब्रुवारी रोजी त्याची रात्रपाळी होती.नेहमीप्रमाणे काम करीत असतांना अचानक त्याच्या अंगावर रॅक पडली.सदरची घटना कंपनीत काम करणाऱ्या अन्य सहकाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी रॅक सरळ करून कृष्णाला उपचारासाठी नागपूर येथील एम्स रुग्णालयात दाखल केले,मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.घटनेची माहिती कंपनी व रुग्णालय प्रशासनाने मृत कृष्णाच्या कुटुंबीयांना कळविली.माहिती कळताच कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला.कृष्णाचे वडील अल्पभूधारक असल्याने कुटुंबाला आधार व्हावा,यासाठी कृष्णा कंपनीत काम करीत होता.
- Advertisement -

