Monday, May 25, 2026
Homeदेसाईगंजउद्याला देसाईगंज येथे काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवडीबद्दल विजय वडेट्टीवार यांचा अभिनंदन सोहळा.....

उद्याला देसाईगंज येथे काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवडीबद्दल विजय वडेट्टीवार यांचा अभिनंदन सोहळा.. – तथा आमदार रामदास मसराम यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोहळा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-राज्याचे माजी विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांची नुकतीच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन सोहळा तसेच आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोहळा व आरमोरी विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्ता मेळावा उद्या शुक्रवार २१ फेब्रुवारीला देसाईगंज शहरात आयोजित करण्यात आला असून सदर सोहळ्यास जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सदर जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोहळा उद्या शुक्रवारी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास दहीकर कॉम्प्लेक्स,कुरखेडा रोड,देसाईगंज(वडसा)या ठिकाणी विविध मान्यवर,पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडणार असून राज्याचे माजी विरोधी पक्षनेते,काँग्रेस महाराष्ट्र विधिमंडळ पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांचा अभिनंदन सोहळा व कार्यकर्ता मेळावा दुपारी २ वाजेच्या सुमारास हटवार मंगल कार्यालय, देसाईगंज (वडसा)या ठिकाणी पार पडणार आहे.सदर सोहळ्यास आरमोरी विधानसभा क्षेत्रासह जिल्ह्यातील विविध मान्यवर,पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांचा सहभाग असणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर बदल्यांचे सुलतान तुकाराम मुंढेनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा स्वीकारला पदभार..

उद्रेक न्युज वृत्त मुंबई :-बदल्यांचे सुलतान म्हणवल्या जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी आज,सोमवार २५ मे रोजी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला.विशेष...

गडचिरोली जिल्ह्यात पुढील दोन दिवस उष्ण लहरींचा इशारा; आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-हवामान विभाग,प्रादेशिक केंद्र नागपूर यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार गडचिरोली जिल्ह्यात  काही ठिकाणी उष्ण लहर ते तीव्र उष्ण लहर निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात...

हृदय हेलावणारी घटना..! आधी चार मुलांना विहरीत ढकलले व नंतर वडिलाने स्वतःही केली आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  बुलढाणा :-जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यात हृदय हेलावणारी घटना आज,सोमवार २५ मे रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आल्याने समाजमन सुन्न झाले आहे.सातपुडा पर्वत रांगांच्या...

बलात्कार पीडितेचे नाव सार्वजनिक करणे पडले महागात.. – गृह विभागाचे प्रधान सचिव,पोलिस आयुक्त तसेच पोलिस निरीक्षक यांना उत्तर सादर करण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बलात्कार पीडितेची किंवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील अल्पवयीन पीडित मुलीची ओळख म्हणजेच नाव किंवा छायाचित्र जाहीर करणे कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!