Saturday, April 18, 2026
Homeकोंढाळाउद्याला कोंढाळा येथे सकल हिंदु समाज मंडळाच्या वतीने "हिंदु संमेलन".. -विविध...

उद्याला कोंढाळा येथे सकल हिंदु समाज मंडळाच्या वतीने “हिंदु संमेलन”.. -विविध कार्यक्रमांचे आयोजन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कोंढाळा(गडचिरोली):-हिंदु जागृतीच्या दिशेने तसेच हिंदु समाजामध्ये नविन उर्जा आणि चेतना प्रदान करण्यासाठी संपूर्ण हिंदु समाज,सनातन धर्म,सनातन संस्कृती आणि सामाजिक एकतेचे प्रतिक असलेले “विराट हिंदु संमेलन” चे आयोजन सकल हिंदु समाज मंडळ कुरुड यांचे वतीने उद्या,मंगळवार १० फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास देसाईगंज तालुक्याच्या श्री दत्त मंदीर कोंढाळा येथे करण्यात आले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ(RSS)च्या स्थापना शताब्दी (१०० वर्षे)निमित्त २०२६ मध्ये देशभर विराट हिंदू संमेलनाचे आयोजन सकल हिंदू समाजाच्या माध्यमातून केले जात आहे.या संमेलनाचा मुख्य उद्देश हिंदू समाजाला संघटित करणे,सामाजिक समरसता वाढवणे आणि सांस्कृतिक जागृती करणे असून या संमेलनांमध्ये संत,स्थानिक नेते आणि हजारो नागरिकांचा सहभाग असतो,तसेच अनेकदा कलश यात्राही काढली जाते.संमेलनात सामाजिक एकता,जिहादसारख्या मुद्द्यांवर चर्चा,मुलींना सक्षम करणे आणि हिंदू समाजातील ‘शक्ति स्मरण’ यावर भर दिला जातो.चालू महिन्यातील मेरठ,गाझियाबाद आणि जयपूर यांसारख्या विविध ठिकाणी अशी मोठी संमेलने झाली आहेत.आरएसएसच्या शताब्दी वर्षात हिंदू समाजाला एकजूट करण्यासाठी आणि त्यांच्या सांस्कृतिक वारश्याची आठवण करून देण्यासाठी हे विराट हिंदू संमेलन आयोजित केले जात आहे.त्यानुसार, उद्या मंगळवारी कोंढाळा येथील दत्त मंदिर परिसरात दुपारी १ वाजेपासून वेषभुषा स्पर्धा,रांगोळी स्पर्धा, देशभक्ती गीत,नृत्य,वक्त्यांचे मार्गदर्शन,संत आर्शिवचन, हनुमान चालीसा,सामुहिक आरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.सदरच संमेलनास ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मोहफुले वेचत असतांनाच बिबट्याचा हल्ला.. – जंगलशिवारात छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्राच्या हरदोली सहवनक्षेत्रातील ३३६ कक्ष क्रमांकाच्या सोनेगाव बीटातील एकमध्ये बिबट्याने मोहफुले वेचत असणाऱ्या महिलेच्या मानेवर हल्ला चढवून ठार केल्याची...

बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर.. – ग्रामीण भागात बालविवाह रोखण्याची जबाबदारी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांवर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर दरवर्षी बालविवाहाच्या घटना घडण्याची शक्यता लक्षात घेता  गडचिरोली जिल्हा प्रशासन व महिला व बालविकास विभाग ॲक्शन मोडवर आले आहे.या...

उष्णतेचा कहर; उद्याला नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-वाढत्या उष्णतेच्या लाटेचा कहर लक्षात घेता नागपूर जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारतीय हवामान विभागाने उद्या,शनिवार १८ एप्रिल रोजी नागपूर...

खताचा काळाबाजार भोवला; देसाईगंजच्या कृषी केंद्र संचालकावर फौजदारी गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांच्या हक्काचे अनुदानित डीएपी खत(DAP)अनधिकृतरीत्या जिल्ह्याबाहेर विकणे,खताचा काळाबाजार करणे तसेच शासकीय ई-पॉस(e-POS) प्रणालीमध्ये फेरफार केल्याप्रकरणी देसाईगंज येथील मे.नाकाडे कृषी केंद्रचे संचालक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!