Tuesday, September 1, 2026
Homeगडचिरोलीकुष्ठांतेयांच्या मानवी अधिकारासाठी विद्यार्थ्यांचा "पत्रलेखन" उपक्रम..

कुष्ठांतेयांच्या मानवी अधिकारासाठी विद्यार्थ्यांचा “पत्रलेखन” उपक्रम..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-सक्षम कुष्ठांतेय स्वाभिमानी संस्था, नागभीड(गडचिरोली व चंद्रपूर जिल्हा)अलर्ट इंडिया मुंबई व राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रम,शासकीय मुला-मुलींचे आश्रम शाळा,मुलचेरा यांच्या संयुक्त समन्वयाने “जागतिक कुष्ठरोग दिन” नुकताच साजरा करण्यात आला.त्या निमित्ताने शासकीय मुला-मुलींचे आश्रम शाळा मुलचेरा येथे कुष्ठांतेयांच्या मानवी अधिकारासाठी विद्यार्थ्यांचा “पत्रलेखन” उपक्रम पार पाडला.या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना कुष्ठरोग विषयीची शास्त्रीय माहिती देण्यात आली.त्यानंतर विद्यार्थ्यांनी पोस्टकार्ड वर कुष्ठरोगाची लक्षणे,कुष्ठांतेयाचे अधिकार याबाबतची माहिती लिहुन कुष्ठांतेयासोबत कुटुंबात,समाजात, सार्वजनिक ठिकाणी तसेच शासकीय स्तरावर कसलाही भेदभाव न करता सर्व कुष्ठांतेयांना सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे जीवन जगण्याचा अधिकार असल्यामुळे कुष्ठांतेयांसोबत प्रतिष्ठेने व सन्मानपूर्वक वागणूक देण्याचा संदेश पत्राद्वारे कुटुंबीयांसह नातेवाईकांना देण्यात आला.पार पडलेल्या कार्यक्रमास तब्बल ७१ विद्यार्थ्यांनी   सहभाग नोंदवून उपस्थिती दर्शविली.तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका कोलते,अध्यापक चलाख, आरोग्य विभागाचे तालुका आरोग्य सहाय्यक मिसार, आरोग्यसेविका शितल कुसणाके,प्यारा मेडिकल वर्कर रामजी वड्डे,क्षयरोग पर्यवेक्षक संतोष भुरसे,आरोग्य मित्र काळबांदे,आशा वर्कर सुमीत्रा सरकार,सक्षम कुष्ठांतेय स्वाभिमानी संस्था अलर्ट इंडिया मुंबईचे क्रिष्णा निकुरे, मिलींद बारसींगे आदी उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

आजपासून बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी आज,मंगळवार १ सप्टेंबर पासून 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)अनिवार्य करण्यात आले...

एकल महिला सर्वेक्षणात नाव न समाविष्ट झालेल्या महिलांना नाव नोंदविण्याची संधी- देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!