Monday, August 31, 2026
Homeनागपूरउद्यापासून बारावी बोर्डाची परीक्षा; विभागात ५१४ परीक्षा केंद्रे..

उद्यापासून बारावी बोर्डाची परीक्षा; विभागात ५१४ परीक्षा केंद्रे..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची इयत्ता बारावी बोर्डाची परीक्षा उद्या, मंगळवार १० फेब्रुवारीपासून सुरू होत आहे.यंदा नागपूर विभागात इयत्ता बारावीच्या परीक्षेस एकूण १ लाख ६० हजार २९२ विद्यार्थी बसणार असून विद्यार्थ्यांसाठी ५१४ परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार आहे.यात नागपूर जिल्ह्यात ६५ हजार ४९९ विद्यार्थी,चंद्रपूर जिल्ह्यात २८ हजार ३०५ विद्यार्थी,गोंदिया जिल्ह्यात १९ हजार ८० विद्यार्थी,भंडारा जिल्ह्यात १७ हजार ३९३ विद्यार्थी,वर्धा जिल्ह्यात १६ हजार ६१९ विद्यार्थी तर गडचिरोली जिल्ह्यात १३ हजार ३९६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे,परीक्षा सुरळीत व सुरक्षितपणे पार पडावी यासाठी प्रश्नपत्रिकांच्या सुरक्षिततेसाठी ८४ गोपनीय केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे.
इयत्ता बारावीची परीक्षा ही १० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ पर्यंत चालणार आहे.कॉपीमुक्त व पारदर्शक परीक्षा होण्यासाठी सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे बंधनकारक करण्यात आले असून, त्याबाबत केंद्र संचालकांकडून लेखी हमी घेण्यात आली आहे. परीक्षा केंद्रात मोबाइल फोन,कॅलक्युलेटर,डिजिटल घड्याळ,कागदी चिठ्ठया,गाइड,आदी साहित्य नेण्यास सक्त मनाई आहे.सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्हीद्वारे निगराणी ठेवली जाणार असून,संवेदनशील केंद्रांवर विशेष बैठे पथके तैनात असतील.पोलिस विभागाकडून ड्रोन कॅमेऱ्यांच्या माध्यमातूनही देखरेख केली जाण्याची शक्यता आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; ७ लाख ३८ हजार ३०१ मतदारांवर शिक्कामोर्तब.. – २७ हजार ४१४ ‘जुळवणी न झालेले मतदार’; तर ५६...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण(एसआयआर) कार्यक्रम-२०२६ अंतर्गत १ ऑक्टोंबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप...

शासकीय आदिवासी वसतिगृहांच्या खासगीकरणाचे आरोप तथ्यहीन.. – राज्यातील ४९० शासकीय वसतिगृहांतील विद्यार्थ्यांसाठी १८ प्रकारचे उपक्रम मोफत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासी विकास विभागाच्या शासकीय विद्यार्थी वसतिगृहांचे खासगीकरण करण्यात येत असल्याचे किंवा वसतिगृहांचे व्यवस्थापन खासगी संस्थेकडे सोपविण्यात आल्याचे आरोप तथ्यहीन आहेत. वसतिगृहांची...

आज आमदार मसराम यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा देसाईगंज उपविभागीय कार्यालयावर धडकला महामोर्चा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आरमोरी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी,कष्टकरी,आदिवासी,निराधार व बेरोजगारी,महागाईने तसेच स्मार्ट मिटरने त्रस्त नागरीकांच्या न्याय हक्कासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज,सोमवार ३१ ऑगस्ट रोजी आरमोरी विधानसभा...

जंगली हत्तींच्या हैदोसाने शेतकरी त्रस्त..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या आरमोरी तालुक्यातील विविध परिसरात सलग तीन दिवसांपासून जंगली हत्तींनी शेतशिवारातील धानपिकात धुमाकूळ घालून मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याने जंगली हत्तींच्या हैदोसाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!