Monday, August 31, 2026
Homeनागपूरदोन अस्वलांचा पती-पत्नीवर हल्ला; पत्नीचा मृत्यू तर पती गंभीर..

दोन अस्वलांचा पती-पत्नीवर हल्ला; पत्नीचा मृत्यू तर पती गंभीर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-आर्थिक परिस्थती बेताची असल्याने व घरगुती गॅस कनेक्शन व सिलिंडर खरेदी करण्याची ऐपत नसल्याने चुलीवर स्वयंपाक करण्यासाठी सरपण (काड्या)गोळा करण्यासाठी जंगल परिसरात गेलेल्या पती-पत्नीवर दोन अस्वलांनी हल्ला चढवल्याने यात पत्नीचा मृत्यू झाला तर पती गंभीर जखमी झाल्याची घटना रामटेक वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या चिचदा उपवन क्षेत्रातील मानेगाव बीटाच्या कक्ष क्रमांक-२९२ मध्ये रविवारी घडली.सुलोचना राजकुमार भलावी वय ३० वर्षे असे मृत पत्नीचे तर राजकुमार राजाराम भलावी वय ४८ वर्षे असे गंभीर जखमी पतीचे नाव असून,दोघेही उमरी (चिचदा),ता.रामटेक,जि.नागपूर येथील रहिवासी आहेत.दोघेही मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.दोघेही काल रविवारी दुपारी गावालगतच्या मानेगाव शिवारातील जंगलात सरपण गोळा करण्यासाठी गेले होते.सरपण गोळा करीत असतांनाच दोघांवर अस्वलाने अचानक हल्ला चढविला.त्यात दोघेही गंभीर जखमी झाले.या प्रकाराची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळ गाठून दोघांनाही रामटेक शहरातील उपजिल्हा रुग्णालयात नेले.तिथे डॉक्टरांनी तपासणीअंती सुलोचनाला मृत घोषित करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला तर राजकुमारवर उपचार सुरू केले.घटनेची माहिती होताच वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल होत पुढील प्रक्रिया पार पाडून आर्थिक मदतीची तजवीज  केली.स्थानिक सहायक वनसंरक्षक गोविंद लुचे यांच्या हस्ते सानुग्रह निधीचा धनादेश मृत महिलेचे पती राजकुमार भलावी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून दोन्ही अस्वलांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; ७ लाख ३८ हजार ३०१ मतदारांवर शिक्कामोर्तब.. – २७ हजार ४१४ ‘जुळवणी न झालेले मतदार’; तर ५६...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण(एसआयआर) कार्यक्रम-२०२६ अंतर्गत १ ऑक्टोंबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप...

शासकीय आदिवासी वसतिगृहांच्या खासगीकरणाचे आरोप तथ्यहीन.. – राज्यातील ४९० शासकीय वसतिगृहांतील विद्यार्थ्यांसाठी १८ प्रकारचे उपक्रम मोफत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासी विकास विभागाच्या शासकीय विद्यार्थी वसतिगृहांचे खासगीकरण करण्यात येत असल्याचे किंवा वसतिगृहांचे व्यवस्थापन खासगी संस्थेकडे सोपविण्यात आल्याचे आरोप तथ्यहीन आहेत. वसतिगृहांची...

आज आमदार मसराम यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा देसाईगंज उपविभागीय कार्यालयावर धडकला महामोर्चा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आरमोरी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी,कष्टकरी,आदिवासी,निराधार व बेरोजगारी,महागाईने तसेच स्मार्ट मिटरने त्रस्त नागरीकांच्या न्याय हक्कासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज,सोमवार ३१ ऑगस्ट रोजी आरमोरी विधानसभा...

जंगली हत्तींच्या हैदोसाने शेतकरी त्रस्त..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या आरमोरी तालुक्यातील विविध परिसरात सलग तीन दिवसांपासून जंगली हत्तींनी शेतशिवारातील धानपिकात धुमाकूळ घालून मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याने जंगली हत्तींच्या हैदोसाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!