Saturday, August 29, 2026
Homeचंद्रपूरउत्पादन शुल्क अधीक्षकासह तिघेजण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात…-चंद्रपुरातील उत्पादन शुल्क विभागाचे पदाधिकारी

उत्पादन शुल्क अधीक्षकासह तिघेजण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात…-चंद्रपुरातील उत्पादन शुल्क विभागाचे पदाधिकारी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :-चंद्रपुरातील उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील, दुय्यम निरीक्षक चेतन खारोडे व कार्यालय अधीक्षक अभय खताळ या तिघांना १ लाखाची लाच स्वीकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काल,मंगळवारी रंगेहाथ पकडून अटक केली आहे.

नवीन बिअर दुकानाच्या परवान्यासाठी त्यांनी १ लाख ३० हजारांची मागणी केली होती.घुग्गुस येथे गोदावरी बार अँड रेस्टॉरंट आहे.त्या मालकाने नोव्हेंबर २०२३ मध्ये नवीन बिअर शॉपीच्या परवान्यासाठी अर्ज केला होता.मात्र त्या वेळी त्यांना अधीक्षक संजय पाटील व कार्यालय अधीक्षक अभय खताळ यांनी नाहक त्रास देत टाळाटाळ केली.काही दिवसांनी दुय्यम निरीक्षक चेतन खारोडे यांनी,मी तुमचा बिअर शॉपीचा परवाना मंजूर करून देतो,

मात्र त्यासाठी अधीक्षक व स्वतःसाठी १ लाख रुपयांची मागणी केली.दरम्यान २५ एप्रिलला तक्रारकर्त्याने चंद्रपूर एसीबीत तक्रार दिली.उत्पादन शुल्क विभागाच्या चंद्रपूर कार्यालयात ७ मे रोजी कार्यालय अधीक्षक अभय खताळ यांनी खारोडे यांच्या सांगण्यावरून १ लाखाची रक्कम स्वीकारली. त्यानंतर खारोडेंनी पैसे मिळाल्याबाबत अधीक्षक पाटील यांना मोबाइलद्वारे सूचना दिली.यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खात्री पटवत,१ लाख रुपये स्वीकारताना अभय खताळ यांना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी अधीक्षक संजय पाटील,अभय खताळ व चेतन खारोडे यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राहुल माकनिकर, अप्पर पोलीस अधीक्षक संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक मंजुषा भोसले यांच्या नेतृत्वात पोलीस कर्मचारी नरेश नन्नावरे,हिवराज नेवारे,संदेश वाघमारे,राकेश जांभुळकर,प्रदीप ताडाम,पुष्पा काचोळे व सतीश सिडाम यांनी केली.अधीक्षक संजय पाटील यांच्या कार्यकाळात ४०० नव्या बिअरबारला परवाने : वर्ष २०१५ मध्ये तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी केली होती.६ वर्षानंतर म्हणजेच २०२१ ला महाविकास आघाडी सरकारने जिल्ह्याची दारूबंदी हटवली.दारूबंदी हटल्यानंतर चंद्रपुरातील उत्पादन शुल्क विभागाने नियमबाह्य दारू दुकानासाठी परवाने दिले.ज्यावेळी चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी करण्यात आली,त्यावेळी एकूण ३५० बिअरबार होते.वर्ष २०२१ मध्ये दारूबंदी उठवल्यावर जिल्ह्यात तब्बल ७५० बिअरबार अस्तित्वात आले.अधीक्षक संजय पाटील यांच्या कार्यकाळात ४०० नव्या बिअर बारला परवाने देण्यात आले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गरोदर मातेला नेले झोळीतून; घटनेनंतर प्रशासनाला आली जाग.. -आता कोईदूळ नाल्यावरील पुलाचा प्रश्न मार्गी लागणार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील कोईदूळ गावातील रहिवासी छाया सुरेश नैताम वय २६ वर्षे यांना आज,शुक्रवार २८ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास प्रसूती कळा सुरू...

सोशल मीडियावर जातीवाचक वक्तव्य करणे कराळे मास्तरला चांगलेच भोवले; अटक करून कारागृहात रवानगी..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-वर्ध्यातील 'फिनिक्स अकॅडमी'चे संचालक, सामाजिक कार्यकर्ते तथा सोशल मीडिया इन्फ्लुएंसर असलेले कराळे मास्तर यांना सोशल मीडियावर एका विशिष्ट समाजाविषयी जातीवाचक वक्तव्य...

आता मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची जबाबदारी नेमकी कोणाकडे? -तसेही “सरपंच-प्रशासक” बिन पगारी अन् फुल्ल अधिकारीच..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शासनाने गावगाडा हाकणाऱ्या पदाधिकाऱ्यांना मोठा दिलासा देत शनिवार २१ फेब्रुवारी २०२६ रोजी महाराष्ट्र राज्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली वा...

राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या अंगरक्षकावर महिलेचा लैंगिक शोषणाचा आरोप; पोलिसांत गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याचे वित्त व नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधि व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या ३८ वर्षीय अंगरक्षकाने(पोलीस कर्मचारी)एका विवाहित...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!