चंद्रपूर :-मोठ्या कष्टाने फुलवलेल्या शेतीचे झालेले नुकसान असह्य झाल्याने ऐन बैलपोळ्याच्या दिवशीच शेतकऱ्याने आयुष्याची दोर कापल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्याच्या गोंडपिपरी तालुक्यातील अडेगाव येथे बैलपोळ्याच्या दिवशी घडली.गणपत भाऊजी नागापूरे वय ४२ वर्षे रा.अडेगाव,ता.गोंडपिपरी,जि.चंद्रपूर असे शेतातील कीटकनाशक औषध प्राशन करून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.शेतकरी गणपत नागापुरे यांच्याकडे तीन एकर शेती आहे.दरवर्षी अतिवृष्टी आणि पुरामुळे त्यांच्या शेतीचे मोठे नुकसान होत असते.यंदा त्यांनी तीन एकरमध्ये कापूस आणि धान पिकाची लागवड केली आहे.मात्र,संततधार पावसामुळे वर्धा नदीला पूर आला आणि पुरामुळे त्यांची शेती पाण्याखाली गेली.अद्यापही त्यांची शेती पाण्याखालीच आहे.अश्यातच काल शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास गावात बैल पोळा साजरा करण्याची तयारी सुरू होती. त्यातच गणपत नागापूरे हे शेतावर गेले.शेतात फवारणीसाठी कीटकनाशक औषध ठेवले होते.तेच कीटकनाशक त्यांनी प्राशन करून जीवनाचे शेवट केले. घटनेची माहिती गावकऱ्यांना होताच त्यांनी घटनास्थळी दाखल होत पोलिसांना माहिती दिली.लागलीच पोलिसांनी घटनास्थळ गाठत पांचामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोंडपिपरी रुग्णालयात दाखल केला.परिसरात घटनेने शोककळा पसरली आहे.
इकडे बैल पोळा साजरा अन् तिकडे शेतावर गेला..! – बैलपोळ्याच्या दिवशीच शेतकऱ्याने कापली आयुष्याची दोर..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक

