Saturday, September 5, 2026
Homeगडचिरोलीऐन सणाच्या दिवशीच नाल्यात वाहून गेलेल्या चिमुकल्याचा आढळला मृतदेह..!

ऐन सणाच्या दिवशीच नाल्यात वाहून गेलेल्या चिमुकल्याचा आढळला मृतदेह..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.पोळा सणानिमित्त शासकीय आश्रम शाळेतून घरी आलेल्या चिमुकल्याचा नाल्यात वाहून गेल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,शुक्रवार २२ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे.रिशान प्रकाश पुंगाटी वय ६ वर्षे रा.कोयर,ता.भामरागड, जि.गडचिरोली असे मृत पावलेल्या मुलाचे नाव असून तो इयत्ता पहिल्या वर्गात शासकीय आश्रम शाळा लाहेरी येथे शिकत होता.
पोळा सण असल्याने रिशान हा आश्रम शाळेतून घरी परतला होता.त्याचे वडील प्रकाश पुंगाटी यांनी त्याला सणासाठी गावाकडे घेऊन आले होते.अश्यातच गुरुवार २१ ऑगस्ट रोजी रिशान हा खेळता-खेळता गावानजीक असलेल्या नाल्याजवळ गेला.सायंकाळ होऊनही तो घरी परतला नसल्याने गावातील नागरिकांनी त्याचा शोध घेतला.मात्र,रिशानचा कुठेही थांगपत्ता लागलेला नसल्याने परत आज शुक्रवारी सकाळच्या सुमारास महसूल प्रशासनासह ग्रामस्थांच्या मदतीने शोधमोहीम राबवली असता,गावानजीक असलेल्या नाल्यात चिमुकल्या रिशानचा मृतदेह आढळून आला.त्यामुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.ऐन पोळा सणाच्या दिवशीच मृतदेह आढळून आल्याने ग्रामस्थांच्या आनंदावर एकप्रकारे विरजण पडले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘या’ उमेदवारांना मिळणार मुलाखतीची तयारी करण्यासाठी १० हजाराचे आर्थिक सहाय्य..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षा-२०२५ मध्ये उत्तीर्ण झालेल्या अनुसूचित जातीच्या उमेदवारांना मुलाखतीची तयारी करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व...

सतर्कता बाळगा..! नुकसानभरपाईच्या बहाण्याने शेतकऱ्यांकडून घेतले आधार कार्ड,पॅन कार्ड आणि सातबारे उतारे.. – अन् उचलले ७३ कोटींहून अधिकचे कर्ज..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-भोळ्या-भाबड्या,गरीब आणि अल्पशिक्षित शेतकऱ्यांना सरकारी योजनेअंतर्गत दरवर्षी दहा हजारांची नुकसाभरपाईची मदत मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांची कागदपत्रे मिळवली आणि त्यांच्याच नावावर...

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!