Saturday, May 2, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तऑनलाईन गेममध्ये पैसे असतील तर लवकर काढून घ्या..! ऑनलाइन गेमिंग उद्योगाला मोठा...

ऑनलाईन गेममध्ये पैसे असतील तर लवकर काढून घ्या..! ऑनलाइन गेमिंग उद्योगाला मोठा धक्का; गेमवर बंदी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-स्मार्टफोनमुळे ऑनलाईन गेम खेळाचे जाळे खूप दूरवर पसरले.यात पैश्याची गुंतवणूक करून गेम खेळणाऱ्यास मोठी रक्कम देण्यात येणार असल्याचे आमिष दाखवले जाते. त्यामुळे अनेकजण गेमाच्या आहारी जाऊन सर्वकाही गमावून बसतात.त्यासाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलत ऑनलाईन गेमिंगवर बंदी घालणाऱ्या विधेयकाचे कायद्यात रुपांतर केले आहे. आता यापुढे  ऑनलाईन गेमिंग आणि त्याची जाहिरात करणे गुन्हा मानले जाणार आहे.या कायद्यानुसार,दोषींना ३ वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि १ कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद करण्यात आली आहे.याबाबत आज,शुक्रवार २२ ऑगस्ट रोजी देशाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर झालेल्या विधेयकाला मंजुरी दिली आहे.यामुळे विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाले असून देशातील ऑनलाइन गेमिंग उद्योगाला अब्जो रुपयांचा फटका बसणार आहे.सर्वात मोठा हादरा ड्रीम ११,माय ११ सर्कल, winzo गेम यांना बसला आहे. त्यामुळे यामध्ये वा इतर गेममध्ये पैसे जमा असलेल्यांनी त्वरित रक्कम काढून घेणे आवश्यक आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या नावात आईचे नाव अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-आईच्या योगदानाला विशेष सन्मान देण्यासाठी,लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी आता महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल...

सहपालकमंत्र्यांच्या हस्ते बचत गटाच्या सहा महिला प्रभागसंघांना फिरत्या रेस्टॉरंटचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील ग्रामीण महिलांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांना सन्मानाने जगण्यासाठी 'उमेद' अभियान आणि जिल्हा प्रशासनाने एक अभिनव पाऊल उचलले आहे.महाराष्ट्र दिनाचे औचित्य...

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!