Saturday, June 20, 2026
Homeमुंबईआशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचा कर्तव्य बजावत असतांना अपघाती मृत्यू झाल्यास मिळणार १०...

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचा कर्तव्य बजावत असतांना अपघाती मृत्यू झाल्यास मिळणार १० लाख रुपये… -१ एप्रिल २०२४ पासून लागू; महाराष्ट्र शासनाचा आदेश निर्गमित

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या कामाचे स्वरूप लक्षात घेता; कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू झाल्यास १० लाख रुपये व कायमस्वरुपी अंपगत्व आल्यास ५ लाख रुपये रकमेचे सानुग्रह अनुदान लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.याबाबत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्याला यश आले असून,या संदर्भातील महाराष्ट्र शासनाचा आदेश निर्गमित करण्यात आला आहे.१ एप्रिल, २०२४ पासून हा निर्णय लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना सानुग्रह अनुदान लागू करण्यासाठी प्रति वर्ष अंदाजित रु.१.०५ कोटी इतका आवर्ती निधी मंजूर करण्यात आला आहे.यासाठी आवश्यक असणारा निधी आगामी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात आली आहे.
आरोग्य यंत्रणा,सेवाभावी संस्था व ग्रामस्थ, समाजातील अन्य घटक यांमध्ये आरोग्यासंदर्भात जागरुकता,सुसंवाद,समन्वय,प्रोत्साहन निर्माण करण्याच्या दृष्टीने “आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक” महत्वपूर्ण सामाजिक दुवा म्हणून कार्यरत आहेत. राज्यातील आशा स्वयंसेविकांचा माता आरोग्य,बाल आरोग्य,कुटुंब नियोजन इत्यादी कारणांसाठी नियमित गृहभेटी देणे,माता व बालकांना मार्गदर्शन करणे, रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र,ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय,जिल्हा रुग्णालय येथे संदर्भीत करणे अशा प्रकारची कर्तव्ये बजावित असतात.
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या कामाचे स्वरूप विचारात घेऊन आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचा कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू झाल्यास १० लाख रुपये व कायमस्वरुपी अंपगत्त्व आल्यास ५ लाख रुपये इतके सानुग्रह अनुदान देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

खतरनाक कारनामा..! नीट परीक्षेच्या विद्यार्थ्याला चक्क परदेशातील दिले परीक्षा केंद्र..

उद्रेक न्युज वृत्त नागपूर :-काही कालावधीपासून पेपरफुटी तसेच शिक्षणाच्या आयचा घो होत असल्याने होतकरू विद्यार्थ्यांचे उज्वल भवितव्य धोक्यात येऊ लागले आहे.पालक वर्ग आपली मुले शिकून...

तीन तिघडा अन् काम बिघडा..! वन परिक्षेत्र अधिकारी,वनरक्षक व खाजगी इसम एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त गडचिरोली :-अनेकांना वाटतेय की,एखाद्या तिसऱ्याच व्यक्तींच्या माध्यमातून पैश्याची रक्कम घेतली,तर आपले नाव वा आपली करणी उजेडात येणार नाही.पण,लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तसला...

गडचिरोली जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांमुळे लक्षणीय पाणीसाठा निर्माण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात मागील दोन वर्षांत विविध योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत.या कामांमुळे जिल्ह्यात लक्षणीय पाणीसाठा निर्माण झाला असून...

आता भाडेपट्ट्यावरील शासकीय जमिनींच्या अधिकार अभिलेखात असणार ‘महाराष्ट्र शासन’ कब्जेदार..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील भाडेपट्ट्याने प्रदान करण्यात आलेल्या शासकीय जमिनींच्या अधिकार अभिलेखातील नोंदी अधिक अचूक,पारदर्शक आणि एकसमान करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.मुख्यमंत्री...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!