Saturday, June 20, 2026
Homeगडचिरोलीबेपत्ता महिलेचा कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह...

बेपत्ता महिलेचा कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-एटापल्ली तालुक्यातील करपनफुंडी गावातील एका वृद्ध अदिवासी महिलेचा आज,२७ ऑगस्ट रोजी नदीमध्ये मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.बुर्गो रैनू गोटा वय ५५ वर्षे असे मृत महिलेचे नाव आहे.
करपनफुंडी गावापासून पाच किलोमीटर अंतरावरील जांभिया आणि बांडे या दोन नद्यांच्या संगमानजीक गोटा दाम्पत्याची शेती आहे.अलीकडेच धानाची रोवणी झाल्याने मागील काही दिवसांपासून बुर्गो व पती रैनू जंगली गोटा वय ६० वर्षे हे दोघेही शेतावर असलेल्या झोपडीत राहत होते.परंतु शनिवारपासून
दोघेही बेपत्ता होते.कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला असता दोघेही आढळून आले नाही.परंतु आज मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास नदीत एक मृतदेह असल्याची माहिती मिळाली.नातेवाईकांनी जवळ जाऊन बघितले असता कुजलेल्या अवस्थेत असलेला मृतदेह बुर्गोचा असल्याचे समजले.मात्र, रैनूचा कुठेही थांगपत्ता लागला नाही.जादुटोण्याच्या संशयावरुन दोघांची हत्या करण्यात आल्याचा नातेवाईकांचा संशय आहे.घटनास्थळ नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशिल असल्याने पोलिस तपासात अडचणी येत आहेत.बुर्गी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सोमनाथ पुरी घटनेचा तपास करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

खतरनाक कारनामा..! नीट परीक्षेच्या विद्यार्थ्याला चक्क परदेशातील दिले परीक्षा केंद्र..

उद्रेक न्युज वृत्त नागपूर :-काही कालावधीपासून पेपरफुटी तसेच शिक्षणाच्या आयचा घो होत असल्याने होतकरू विद्यार्थ्यांचे उज्वल भवितव्य धोक्यात येऊ लागले आहे.पालक वर्ग आपली मुले शिकून...

तीन तिघडा अन् काम बिघडा..! वन परिक्षेत्र अधिकारी,वनरक्षक व खाजगी इसम एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त गडचिरोली :-अनेकांना वाटतेय की,एखाद्या तिसऱ्याच व्यक्तींच्या माध्यमातून पैश्याची रक्कम घेतली,तर आपले नाव वा आपली करणी उजेडात येणार नाही.पण,लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तसला...

गडचिरोली जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांमुळे लक्षणीय पाणीसाठा निर्माण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात मागील दोन वर्षांत विविध योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत.या कामांमुळे जिल्ह्यात लक्षणीय पाणीसाठा निर्माण झाला असून...

आता भाडेपट्ट्यावरील शासकीय जमिनींच्या अधिकार अभिलेखात असणार ‘महाराष्ट्र शासन’ कब्जेदार..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील भाडेपट्ट्याने प्रदान करण्यात आलेल्या शासकीय जमिनींच्या अधिकार अभिलेखातील नोंदी अधिक अचूक,पारदर्शक आणि एकसमान करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.मुख्यमंत्री...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!