Wednesday, August 26, 2026
Homeआरमोरीआरमोरी शहर असुरक्षित; चोरीच्या घटनांमध्ये वाढ.. - पोलिसांना खुले चॅलेंज; चोरट्यांनी दुकाने...

आरमोरी शहर असुरक्षित; चोरीच्या घटनांमध्ये वाढ.. – पोलिसांना खुले चॅलेंज; चोरट्यांनी दुकाने फोडण्याचा चालवला सपाटा; पुढील नंबर कुणाचा?

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
आरमोरी(गडचिरोली):-हल्ली आरमोरी शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होतांना दिसून येत आहे. चोरटे आरमोरी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका बजावीत असल्याने शहरातील नागरिक भयभीत झाले आहेत.अशातच आरमोरी पोलिसांना चोरटे पकडण्यास अद्यापही यश आले नसल्याने चोरट्यांची हिंमत आणखी वाढून पुढील नंबर कुणाचा अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,अज्ञात चोरट्यांनी
चार दिवसांपूर्वी एकाच रात्री आरमोरी शहरातील
सहा दुकाने फोडून हजारोंचा मुद्देमाल लंपास केला होता.मुद्देमाल लंपास करून ‘ऐश करेंगे ओर क्या’ असे म्हणीत पोलिसांना खुले चॅलेंज केले व परत पुन्हा दोन दिवसांपूर्वी म्हणजेच ४ डिसेंबरला आरमोरी शहरातील बर्डी मुख्य मार्गालगत असलेल्या नवीन बसस्थानकाच्या समोरील एका ज्वेलर्सच्या दुकानास रात्री दोन भगदाड पाडून १ लाख ६३ हजार ५०० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना समोर आली आहे.काल,गुरुवारी ५ डिसेंबरच्या सकाळी अरविंद डुंबरे हे नेहमीप्रमाणे दुकानाचे शटर उघडून आत गेले.त्यावेळी त्यांना दुकानातील साहित्य अस्ताव्यस्त असल्याचे दिसले.त्यांनी अधिक चौकशी केली असता दुकानात चोरी झाल्याचे दिसून आले.
नवलाची बाब म्हणजे चोट्यांनी शक्कल लढवून मध्यरात्री दुकानाचे शटर न तोडता दुकानाच्या मागील भिंतीला मोठे दोन भगदाड पाडले.त्यातून एकाने दुकानात प्रवेश करून दुकानातील साहित्याची उचकटून प्लेट,पायल,करंडे,वाटी ब्रेसलेट,गणपती मूर्ती,लक्ष्मी मूर्ती आदी चांदीचे साहित्य व दागिने चोरून मागील भिंतीच्या बाहेर असलेल्या आपल्या साथीदाराकडे दिले.त्यानंतर ते पसार झाले.सदर चोरीची घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून चोरट्याने तोंडाला कापड बांधलेले असल्याचे दिसून येत आहे.मात्र,त्याचा त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नाही.
घटना निदर्शनास येताच अरविंद डुंबरे यांनी आरमोरी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली.ठाणेदार कैलास गवते यांनी घटनास्थळ गाठून श्वानपथक व ठसेतज्ज्ञांना पाचारण केले; मात्र,कुठलाही सुगावा न लागल्याने चार दिवसांपूर्वीची सहा दुकाने व ५  डिसेंबरला उघडकीस आलेला सोना-चांदी विक्रेता,यांचे दुकान लुटणाऱ्या चोरट्यांनी खुले आव्हान पोलिसांना केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; दीड हजार खात्यात येण्यास सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने मोठा निर्णय घेत मागील जुलै महिन्याच्या प्रलंबित...

उद्याला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले गडचिरोली दौऱ्यावर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून)शिवेंद्रराजे भोंसले हे उद्या,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.या दौऱ्यात ते जिल्ह्यातील...

बापरे..! स्मशानभूमीत रात्रीच्या अंधारात अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार.. -मांत्रिक पळाला घटनास्थळावरून..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या कुही तालुक्यात एका अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार गाव नजीकच्या स्मशानभूमीत उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या...

कुरखेडा शहरात पैगंबर जन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-इस्लाम धर्माचे प्रवर्तक प्रेषीत मोहम्मद पैगंबर यांची १५०१ वी जयंती आज,बुधवार २६ ऑगस्ट रोजी कुरखेडा शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवित उत्साहात साजरी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!