Saturday, September 5, 2026
Homeदेसाईगंज'आमदारचे सांगण्यावरुन आम्ही माहिती देत नाही'.. - देसाईगंज-वडसा वन विभागाचे उपवनसंरक्षकांवर हक्क...

‘आमदारचे सांगण्यावरुन आम्ही माहिती देत नाही’.. – देसाईगंज-वडसा वन विभागाचे उपवनसंरक्षकांवर हक्क भंगाच्या कारवाईची मागणी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज-वडसा वन विभागांतर्गत येणाऱ्या  वनपरिक्षेत्र प्रादेशिक कार्यालयाच्या क्षेत्रातील करण्यात आलेल्या विकास कामांविषयीची माहिती आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी देसाईगंज-वडसा वन विभागाचे उपवनसंरक्षक वरुण बी.आर.यांना वारंवार मागणी करूनही दिली नाही.उलट ‘आमदारचे सांगण्यावरुन आम्ही माहिती देत नाही’ असे वक्तव्य करून माहिती देण्याचे टाळल्याने आमदार मसराम यांनी आज, बुधवार ५ मार्चला राज्याचे विधानसभाध्यक्ष यांना
महाराष्ट्र विधानसभा नियम २७३ अन्वये विशेष हक्कभंगाची सूचना अंतर्गत कारवाईची मागणी केली आहे.
आमदार मसराम यांनी दिलेल्या पत्रात म्हटले की,
गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी विधानसभा संघात बराच भाग हा वन विभागाचा असून वनपरिक्षेत्र अंतर्गत सन २०२२ पासून झालेल्या विकास कामांमध्ये अनियमितता आढळून आल्याचे निदर्शनास आले असता,सदर विकास कामे ही उपवनसंरक्षक  वरुण बी.आर.यांनी एकाच कंत्राटदाराला हाताशी धरुन केल्याचे उघड झाले आहे.यामध्ये बराच आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा प्रकार संशय निर्माण करत असून मी स्वतः त्या बाबतची संपूर्ण लेखी माहिती मागितली असूनसुध्दा अजूनपर्यंत मला कुठलीही माहिती मिळालेली नाही.त्यामुळे मी अधिकाऱ्यांना दूरध्वनी वरुन वारंवार माहिती पाठवण्यास सांगितले असता ‘आमदारचे सांगण्यावरुन आम्ही माहिती देत नाही’, असे उध्दटपणे उत्तर या अधिकाऱ्याकडून देण्यात आले.तसेच वार्षिक जिल्हा योजनेमध्ये प्रस्तावित केलेली कामे श्री.वरुण यांनी न घेता माझे पत्राला केराची टोपली दाखवली आहे.या सर्वप्रकारामुळे स्थानिक लोकप्रतिनिधीचा जाणीवपूर्वक सर्वोच्च सभागृहातील सदस्याचे अपमान होत असल्याने उपवनसंरक्षक वरुण बी.आर.व संबंधित अधिकाऱ्यांवर विशेष हक्क भंगाची सूचना देत असून या अधिकाऱ्यांवर विशेष हक्क भंगाच्या  कारवाईची मागणी मसराम यांनी महाराष्ट्र राज्याचे विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांचेकडे केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सतर्कता बाळगा..! नुकसानभरपाईच्या बहाण्याने शेतकऱ्यांकडून घेतले आधार कार्ड,पॅन कार्ड आणि सातबारे उतारे.. – अन् उचलले ७३ कोटींहून अधिकचे कर्ज..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-भोळ्या-भाबड्या,गरीब आणि अल्पशिक्षित शेतकऱ्यांना सरकारी योजनेअंतर्गत दरवर्षी दहा हजारांची नुकसाभरपाईची मदत मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांची कागदपत्रे मिळवली आणि त्यांच्याच नावावर...

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!