- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-राज्य शासनाने मोठ्या गाजावाजात गौरी-गणपती उत्सवानिमित्त राशन दुकानातून चार जिन्नस असलेला आनंदाचा शिधा गरीब पात्र लाभार्थींना देण्याची घोषणा केली होती.अशातच गौरी-गणपती उत्सव संपल्यानंतरही देसाईगंज तालुक्यात आनंदाचा शिधा मिळाला नसल्यामुळे लाभार्थ्यांच्या तोंडाला पाने पुसले गेल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
राज्य सरकार विविध सणानिमित्त पात्र लाभार्थ्यांना प्रत्येकी एक किलो रवा,चणाडाळ,साखर आणि एक लिटर सोयाबीन तेल,असा ‘आनंदाचा शिधा’ देत असते.यावेळी गौरी-गणपती उत्सवानिमित्त आनंदाचा शिधा देण्याचे जाहीर करण्यात आले होते.त्यानुसार अनेक पात्र लाभार्थी गृहिणींनी गोड पक्वान्न बनविण्याचे निश्चित केले होते.परंतु आनंदाचा शिधा वेळेवर उपलब्ध झालाच नसल्याने दिलेली घोषणा पूर्णपणे फोल ठरली आहे.अशातच आता पात्र लाभार्थी ‘आनंदाचा शिधा’ मिळणार कधी? अशी आशा बाळगून आहेत.
- Advertisement -

