- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-जांभुळघाट येथील आदिवासी शासकीय आश्रम शाळेतील तब्बल २६७ विद्यार्थ्यांची प्रकृती अचानकपणे खालावून मळमळ,उलट्या,पोटदुखी, खाज,अंगावर सुज व चक्कर येण्याचा प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली.यातील ९ विद्यार्थ्यांची प्रकृती आणखी खालावल्याने त्यांना चिमुर उपजिल्हा रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले.जांभुळघाट येथील आदिवासी शासकीय आश्रमशाळा ही चिमूर तालुक्याच्या एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी कार्यालयामार्फत चालवल्या जाते.येथे एकूण ५३८ विद्यार्थी मुले-मुली शिक्षण घेत आहेत.सोमवार ११ ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांची प्रकृती अचानक बिघडली.यात मळमळ उलट्या,पोटदुखी,खाज,अंगावर सुज व चक्कर येण्याचा प्रकार सुरू झाल्याने त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले.यात तब्बल २६७ विद्यार्थी बाधीत झाले.तर ९ विद्यार्थ्यांची प्रकृती जास्त खालावल्याने त्यांना पुढील उपचारार्थ दाखल करण्यात आले.यात वेदीका चौधरी (वर्ग ४),राजेश नानाजी राजनहिरे(वर्ग ७),ऋतुजा आशीष चौधरी (वर्ग १०),चांदणी इंदरशहा सिडाम (वर्ग ९),स्नेहा नरेंद्र गायकवाड (वर्ग ७),मोनाली अनिल धुर्वे (वर्ग ७), सरवरी केशव दोडके(वर्ग १०),शिवाणी अंकोष चौधरी (वर्ग ८),अंजली उमेश फरंदे (वर्ग ४) आदी नऊ विद्यार्थ्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना चिमूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.अश्यातच आदिवासी संघर्ष समितीने विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचा आरोप केला आहे.
- Advertisement -

