Sunday, April 19, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता मोबाईलच्या स्क्रीनवर दिसणार कॉल करणाऱ्याचे खरे नाव..!

आता मोबाईलच्या स्क्रीनवर दिसणार कॉल करणाऱ्याचे खरे नाव..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-फसवणूक करणारे एखाद्याची गोपनीय माहिती मिळविण्यासाठी वा जाहिरातींच्या माध्यमातून जाळ्यात ओढून घेण्यासाठी तसेच इतरांना जाणून बुजून त्रास देण्यासाठी वारंवार अनोळखी नंबरचा वापर करून स्पॅम कॉल म्हणजेच फसवणूक कॉलचा उपयोग करतांना दिसून येतात.अश्यांचा मोबाईल क्रमांक हा सर्वसामान्य मोबाईल क्रमांकासारखाच दिसून येतो. मात्र,त्यांची नावे वा इतर माहिती उघड होत नसल्याने अश्यांवर आळा घालण्यासाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने(ट्राय-TRAI)मोठे पाऊल उचलले आहे.आता प्रत्येक कॉलवर केवळ नंबरच नाही तर
कॉल करणाऱ्याचे नाव पण दिसणार आहे.ही सेवा सरसकट सर्व मोबाईल धारकांना मिळणार आहे. यामुळे स्पॅम करणाऱ्यांना आळा घालण्यास मदत होणार आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने(TRAI) कॉलरचे नाव दाखवणाऱ्या “कॉलिंग नाव सादरीकरण”(calling name presentation-CNAP)सेवेला मंजुरी दिलेली आहे.आता मोबाईल धारकांना केवळ नंबरच नाही तर कॉल करणाऱ्याचे नाव देखील मोबाईलच्या स्क्रीनवर दिसणार आहे.
“कॉलिंग नाव सादरीकरण” या तंत्राने जो कोणी तुम्हाला कॉल करेल,त्यावेळी तुमच्या मोबाईलवर त्या व्यक्तीचे रजिस्टर्ड नाव नंबरसह दिसणार आहे.याचा मुख्य हेतू हा स्पॅम कॉलिंगला आळा घालणे असून मोबाईलधारकांना कॉलर्सची ओळख कळताच कॉल उचलावा की उचलू नये याचा निर्णय घेणे सोपे होणार आहे.तसेच मोबाईलधारकांची अज्ञात नंबरवरुन येणाऱ्या कॉलपासून सुटका होणार आहे.सदरची सेवा सरसकट सर्व मोबाईल धारकांना मिळणार आहे.या सेवेचा वापर करायचा की नाही हे ठरवण्यासाठी मोबाईलधारकांना पर्याय मिळणार आहे.सुरवातीला ही सेवा ४G आणि ५G नेटवर्कवर लागू होणार आहे. २G आणि ३G नेटवर्कवर हिला तांत्रिक अपग्रेड केल्यांनतर सुरू केले जाणार आहे.नवीन मोबाईल डिव्हाईसमध्ये “कॉलिंग नाव सादरीकरण” सपोर्टला अनिवार्य बनवण्याची तयारी सुरू आहे.यामुळे कोणत्याही बनावट वा खोट्या कॉलरपासून फसवणूक होण्याची शक्यता कमी होईल.मोबाईलधारकांची सुरक्षाः कॉलरचे नाव पाहून कॉल घ्यायचा की नाही ते ठरवता येणार आहे.कंपन्या आपल्या खऱ्या ब्रँडच्या नावाने कॉल करु शकतील. यामुळे येणारे कॉल खरे की खोटे एका झटक्यात कळेल.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्त्वाची; सर्व शैक्षणिक संस्था सकाळच्या सत्रात सुरू ठेवण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-दिवसेंदिवस उष्णतेची तीव्रता वाढत असल्याने शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.अश्यातच चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाची...

चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच उडाला भडका; पतीचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-स्वयंपाकघरातील गॅस लिकेज असल्याने चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच आगीचा अचानकपणे भडका उडाला आणि काही क्षणातच सिलिंडरचा जोरदार स्फोट झाला.दरम्यान,संपूर्ण घरात...

वाहनधारकांसाठी दिलासा; गडचिरोली शहरातील ट्रॅफिक सिग्नल काही वेळासाठी राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदर्भातीलच नव्हे तर राज्याच्या विविध जिल्ह्यात उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने जीवाची लाहीलाही होत आहे.अश्यातच शहरातील महत्त्वाच्या...

उष्णतेची तीव्रता; प्रखर उन्हामुळे शेतातच पडली बेशुद्ध.. – शेतकरी महिलेचा मृत्यू; नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उष्णतेचा पारा चढल्याने आरोग्य विभागासह प्रशासन सतर्क झाले आहे.त्यातच,नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहे.विशेष म्हणजे,दुपारी १२...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!