Tuesday, July 21, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तकर्तव्यावर असतांना मद्यप्राशन; एसटीचे सात कर्मचारी निलंबित..!

कर्तव्यावर असतांना मद्यप्राशन; एसटीचे सात कर्मचारी निलंबित..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-एसटी बसचे काही कर्मचारी कर्तव्य बजावत असतांना मद्यप्राशन करून गैरवर्तन करीत असल्याच्या तक्रारी राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांना प्राप्त झाल्या होत्या.त्यानुसार,मद्यपी कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल,असे मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले होते. अश्यातच मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंगळवार २८ ऑक्टोंबर २०२५ रोजी एसटी बसच्या सुरक्षा व दक्षता खात्याला तातडीने मोहीम राबवून अशा मद्यपी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार राज्यभरात एकाच वेळी कोणतीही पूर्व सूचना न देता सर्व विभागांमध्ये कार्यरत असलेले चालक,वाहक आणि यांत्रिक कर्मचाऱ्यांच्या मद्यपान तपासणीची कडक मोहीम राबवण्यात आली.अचानक झालेल्या तपासणी मोहिमेमुळे एसटी महामंडळात एकच खळबळ उडाली आणि तब्बल १ हजार ७०१ कर्मचाऱ्यांची मद्यपान तपासणी करण्यात आली.यात ७१९ चालक,५२४ वाहक आणि ४५८ यांत्रिक कर्मचाऱ्यांचा समावेश होता.कर्तव्य बजावत असतांना सात कर्मचारी मद्यपान केल्याचे आढळून आल्याने त्यांना निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये नाशिक येथील तपासणीत एक चालक,परभणी आणि भंडारा विभागांत प्रत्येकी एक यांत्रिक कर्मचारी मद्याच्या अमलाखाली काम करतांना आढळून आला.तर धुळे विभागाच्या तपासणीत एक यांत्रिक कर्मचारी, एक स्वच्छक आणि एक चालक मद्यपान करतांना आढळले. तर नांदेड विभागाच्या तपासणीत एक वाहक मद्यपान केलेला आढळून आला.कर्तव्य बजावत असतांना मद्यप्राशन करणे गंभीर गुन्हा असून प्रवाशांचा जीव धोक्यात घालण्यासारखे आहे.एसटी महामंडळाने निलंबित सात कर्मचाऱ्यांवर पुढील कार्यवाही सुरू केली असून या मोहिमेचा अहवाल तातडीने मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयात सादर केला जाणार आहे.प्रवाशांची सुरक्षा ही एसटी महामंडळाची सर्वोच्च प्राथमिकता असून भविष्यात नवीन येणाऱ्या बसेसमध्ये चालकाच्या समोर अल्कोहोल तपासणीसाठी ब्रेथ ॲनालिसिस यंत्र बसविण्यात येणार आहे; यामुळे प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या मद्यपी चालकांना अटकाव होईल,असे मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आंधळी येथे मोफत नेत्रसेवा शिबिर संपन्न; ११७ जणांची तपासणी,तर ३२ रुग्णांवर होणार मोफत शस्त्रक्रिया..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महात्मे आय बँक हॉस्पिटल नागपूर,समता फाउंडेशन मुंबई,आधार ग्रामीण विकास संस्था आंधळी आणि गट...

सोनम वांगचुक समर्थनाथ कुरखेड्यात रिपाईच्या वतीने निदर्शने व निवेदन सादर..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-परीक्षांच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणे सुरू झाले आहे. रात्रंदिवस मेहनत घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना काही दिवसांतच कळतेय की अगोदरच पेपरची कॉपी...

डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम; शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन.. -प्रत्यक्ष खताच्या गोणीवरील छापील किंमत पाहूनच खत खरेदी करावे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झाल्याने राज्यासह गडचिरोली जिल्ह्यातही डीएपी खताचा पुरवठा अपेक्षेप्रमाणे होत नसल्याने शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा...

नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन..पुढील चोवीस तास महत्वाचे; चार जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे चित्र आहे. हवामान विभागाने नुकतेच १९ जुलै ते २३ जुलै दरम्यान पाच दिवसांसाठी जोरदार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!