- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
कुरखेडा(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात दाखल झालेला जंगली हत्तींचा कळप बऱ्याच कालावधीपासून कधी आरमोरी तर कधी गडचिरोली तर कधी देसाईगंज तालुक्यात धुमाकूळ घालून शेतकऱ्यांच्या शेतातील पिके,पाईप लाईन,झोपड्या, मानवी हल्ले तसेच इतर नुकसान करून हल्लाबोल करीत आहे.अश्यातच आता जंगली हत्तींच्या दोन गटात विभागणी झालेल्या एका कळपातील काही हत्तींनी कुरखेडा तालुक्याच्या जांभूळखेडा-येरंडी जंगल परिसरात आपला मोर्चा वळवला आहे.काल मंगळवारी दोन जंगली हत्तींनी या परिसरात दर्शन दिल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.पोर्ला वनपरिक्षेत्रात असलेले एका गटातील दोन जंगली हत्ती काल मंगळवारी कुरखेडा वनपरिक्षेत्रात दाखल झाल्याने या हत्तींच्या मागोमाग इतर कळप येण्याची शक्यता असल्याने हत्तींच्या हालचालीवर वनविभागाची करडी नजर असून परिसरातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी; असे आवाहन कुरखेडाचे वन परिक्षेत्र अधिकारी कोपुलवार यांनी केले आहे.चार वर्षापूर्वी ओडिसा,छत्तीसगड राज्य मार्गे गडचिरोली जिल्ह्यात आगमन करणाऱ्या जंगली हत्तींना जिल्ह्यातील भौगोलिक स्थिती चांगलीच भावलेली दिसून येत आहे.त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील जंगल परिसर जंगली हत्ती सोडण्याचे नावच घेत नाही.
- Advertisement -

