Saturday, May 30, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तसट्टा किंगची नुकतीच कारागृहातून सुटका अन् पुन्हा एकदा पोलिसांकडून झटका..!

सट्टा किंगची नुकतीच कारागृहातून सुटका अन् पुन्हा एकदा पोलिसांकडून झटका..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-गुन्हेगारी क्षेत्रातील सट्टा म्हणजेच ‘मटका किंग’ नावाने ओळखला जाणारा सराईत गुन्हेगार नंदू उर्फ नंदकुमार नाईक याला पुणे पोलिसांनी कारवाई करून एक वर्षासाठी नागपूर कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले होते. मात्र,गृहविभागाने करण्यात आलेली कारवाई रद्द करून त्याची सुटका करण्यात आली होती. अशातच नागपूर कारागृहातून बाहेर पडलेला नंदू नाईकने पुन्हा मटका अड्डा सुरू केल्याचे पुणे पोलिसांच्या उघडकीस आले.त्यानुसार खडक पोलिसांनी पुन्हा मटका अड्ड्यावर कारवाई करुन नाईकसह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.नाईकवर पुण्यात जुगार, मटका अड्डा चालविण्याचे ६३ गुन्हे दाखल असून त्याच्यावर पुणे पोलिसांनी झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए)नुसार कारवाई केली होती.वेळोवेळी पोलिसांनी कारवाई केली होती.परंतु त्याच्या वर्तणुकीत सुधारणा झाली नव्हती.पुणे महापालिकेने त्याच्या छत्रपती शिवाजी रस्त्यावरील इमारतीवर अतिक्रमण केल्याप्रकरणी कारवाई केली होती.त्याच्याविरुद्ध झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मंजूर केला होता.त्यानंतर १७ मार्च रोजी नाईक याला वर्षभरासाठी नागपूर कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले होते.नाईक याने ही कारवाई रद्द करण्यासाठी त्याच्या नामांकित वकिलांमार्फत गृहविभागात प्रयत्न केले होते.त्यानुसार गृहविभागाने ही कारवाई नुकतीच रद्द केली होती.नाईक कारागृहातून बाहेर पडला आणि त्याने छत्रपती शिवाजी रस्त्यावरील इमारतीत पुन्हा मटका अड्डा सुरू केला.याबाबतची माहिती खडक पोलिसांना मिळाली.त्यानंतर पोलिसांच्या पथकाने छापा टाकला.या कारवाईत नंदू नाईक वय ७० वर्षे,रा.शाहू चौक, छत्रपती शिवाजी रस्ता,शुक्रवार पेठ पुणे,विजय रंगराव शिंदे वय ६९ वर्षे, रा.शाहू चौक, छत्रपती शिवाजी रस्ता पुणे,शंकर सायअण्णा मॅडम वय ६५ वर्षे,रा.महात्मा फुले पेठ पुणे यांच्यासह एका अल्पवयीनाविरुद्ध याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस नाईक आशिष चव्हाण यांनी याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दिली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘जागतिक तंबाखू विरोधी दिन’ व ‘उच्चरक्तदाब दिना’ निमित्त पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :- 'जागतिक तंबाखू विरोधी दिन' आणि 'जागतिक उच्चरक्तदाब दिना'चे औचित्य साधून गडचिरोली येथे एक विशेष आरोग्य जनजागृती आणि तपासणी शिबिर उत्साहात पार...

कसाई मातेचा माणुसकीला काळिमा फासणारा कारनामा; स्वतःचीच दोन मुले विकली दोन लाखात.. – अल्पवयीन मुलीसोबत भयंकर कृत्य..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-काही कालावधीपासून चंद्रपूर जिल्ह्यात खतरनाक कारनामे उघडकीस येऊ लागलेत.विविध कारनामे उघड होत असतांनाच नुकताच एका कसाई मातेचा माणुसकीला काळिमा फासणारा कारनामा...

आदिवासी महामंडळाच्या नियोजनशून्यतेमुळे शेतकरी संकटात; रब्बीची धान खरेदी केंद्रे अद्याप बंदच.. – गोदामे जुन्याच धानाने गच्च भरलेली..

उद्रेक न्युज वृत्त  गौरव नागपूरकर/देसाईगंज :-रब्बी हंगामातील धान खरेदीसाठी आदिवासी विकास महामंडळाची खरेदी केंद्रे अद्याप सुरू न झाल्याने देसाईगंज(वडसा)परिसरासह गडचिरोली जिल्ह्यातील हजारो शेतकरी तीव्र चिंतेत सापडले...

रखरखत्या उन्हात शेतातच टाकली खाट अन् उपोषणास केली सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाचे हत्यार उपसून आज,शनिवार ३० मे पासून सकाळी दहा वाजे जालना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!