Saturday, September 12, 2026
Homeकुरखेडाआता जंगली हत्तींचा मोर्चा कुरखेडा तालुक्यात..

आता जंगली हत्तींचा मोर्चा कुरखेडा तालुक्यात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कुरखेडा(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात दाखल झालेला जंगली हत्तींचा कळप बऱ्याच कालावधीपासून कधी आरमोरी तर कधी गडचिरोली तर कधी देसाईगंज तालुक्यात धुमाकूळ घालून शेतकऱ्यांच्या शेतातील पिके,पाईप लाईन,झोपड्या, मानवी हल्ले तसेच इतर नुकसान करून हल्लाबोल करीत आहे.अश्यातच आता जंगली हत्तींच्या दोन गटात विभागणी झालेल्या एका कळपातील काही हत्तींनी कुरखेडा तालुक्याच्या जांभूळखेडा-येरंडी जंगल परिसरात आपला मोर्चा वळवला आहे.काल मंगळवारी दोन जंगली हत्तींनी या परिसरात दर्शन दिल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.पोर्ला वनपरिक्षेत्रात असलेले एका गटातील दोन जंगली हत्ती काल मंगळवारी कुरखेडा वनपरिक्षेत्रात दाखल झाल्याने या हत्तींच्या मागोमाग इतर कळप येण्याची शक्यता असल्याने हत्तींच्या हालचालीवर वनविभागाची करडी नजर असून परिसरातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी; असे आवाहन कुरखेडाचे वन परिक्षेत्र अधिकारी कोपुलवार यांनी केले आहे.चार वर्षापूर्वी ओडिसा,छत्तीसगड राज्य मार्गे गडचिरोली जिल्ह्यात आगमन करणाऱ्या जंगली हत्तींना जिल्ह्यातील भौगोलिक स्थिती चांगलीच भावलेली दिसून येत आहे.त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील जंगल परिसर जंगली हत्ती सोडण्याचे नावच घेत नाही.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सासऱ्याने केला सुनेचा खून अन् स्वतःच मारली विहिरीत उडी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या यशोधरानगर पोलिस ठाणे हद्दीच्या पिवळी नदी परिसरातील पाहुणे ले-आऊटमध्ये एक खळबळ उडवणारी घटना आज,शनिवार १२ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस...

राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता; दोन दिवस पावसाचे..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.पुढील दोन दिवस राज्यातील विविध भागात पावसाची तीव्रता कायम राहणार...

नोकरीचे खोटे नियुक्तीपत्र दाखवून दोन महिलांची फसवणूक; दोघांवर गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-मंत्रालयात चांगली ओळख असल्याची बतावणी करून सरकारी रुग्णालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत दोन महिलांची तब्बल १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा...

आता ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार विस्तार अधिकाऱ्यांकडे; विस्तार अधिकारी बनले प्रशासक..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सुरळीत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!