उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज (गडचिरोली) :- सन २०१३-२४ मधील खरीप हंगामातील धान पीक अतिवृष्टीमुळे पुर्णतः उद्धवस्त झाल्यामुळे शेतकऱ्यांना सावकारांकडून व बँकेकडून घेतलेले कर्ज फेडणे दुरापस्त झाले आहे. तो खर्च भरून निघावा म्हणून शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात भाताची लागवड केली आहे. परंतु शिंदे-फडणवीस सरकार ने फक्त ८ तास विज पुरवठा करण्याचा कठोर निर्णय घेतल्यामुळे शेतकऱ्यांना हातातोंडाशी आलेला घास हे सरकार हिराऊन घेत आहेत.दि.१३ फेब्रुवारला केलेल्या आंदोलनामुळे १२ तास विज पुरवठा करण्याचे आश्वासन दिले होते परंतु अद्यापही १२ तास विज पुरवठा करण्यात येत नसल्यामुळे आज,दि.२६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.०० वाजता स्थानिक उपविभागीय अधिकारी तथा तालुका दंडाधिकारी कार्यालयावर सामाजिक कार्यकर्ते रामदास मसराम यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा ठिय्या आंदोलन व शेतकऱ्यांचे प्रतिनिधी श्याम मस्के यांचे आमरण उपोषण तसेच आरमोरी-गडचिरोली मार्गावर भव्य चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.तरी परिसरातील शेतकऱ्यांनी सदर आंदोलनात जास्तीत-जास्त संख्येंनी सहभाग घेऊन आपल्या न्याय मागणीला सहकार्य करावे असे आव्हान सामाजिक कार्यकर्ते रामदास मसराम व अन्य शेतकऱ्यांनी केले आहे.

