Friday, August 28, 2026
Homeचंद्रपूरआज आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे कर्करोग रुग्णालयाचे उद्घाटन..

आज आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे कर्करोग रुग्णालयाचे उद्घाटन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :-आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे आज,सोमवार २२ डिसेंबरला पंडित दीनदयाल चंद्रपूर कर्करोग(कॅन्सर)रुग्णालयाचे उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या हस्ते चंद्रपुरात होणार आहे.मुनगंटीवार यांनी आपल्या व्यावहारिक दृष्टिकोनाने आणि विकासाभिमुख सेवेने टाटा ट्रस्टच्या मदतीने चंद्रपूरच नाही तर विदर्भातील  लोकांसाठी २८० कोटी रुपये खर्चुन १४० खाटांचे पंडित दीनदयाळ उपाध्याय चंद्रपूर कर्करोग रुग्णालय बांधले असून सदरचे केंद्र हे पूर्व विदर्भातील आदिवासी,ग्रामस्थ आणि सामान्य लोकांसाठी नवीन आशा आणि आशेचा किरण ठरणार आहे.कर्करोग रुग्णालयात सीटी सिम्युलेटर(सीटी-एस), मॅमोग्राफी, ३डी/४डी अल्ट्रासाऊंड,३डी/४डी आणि इलास्टोग्राफीसह यूएसजी,सीटी-१६ स्लाइस आणि एसपीईसीटी, २ लिनियर ॲक्सिलरेटर्स, बॅकीथेरपी, डिजीटल एक्स-रे,केमोथेरपी,सर्जिकल ऑन्कोलॉजीसह विशेष उपचार विभाग,आधुनिक प्रयोगशाळा: मायक्रोबायोलॉजी, हेमॅटोलॉजी, हिस्टोपॅथॉलॉजी इत्यादी या सर्व घटकांमुळे हे रुग्णालय पूर्व विदर्भातील सर्वात सक्षम,सुसज्ज आणि व्यापक कर्करोग काळजी केंद्र बनते आहे.राज्याचे अर्थमंत्री असतांना चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाला चालना देणारे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांचे हे फलित असून सर्वसामान्य जनतेसाठी असलेली कळकळ त्यांच्या दूरदृष्टीने लक्षात येते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गरोदर मातेला नेले झोळीतून; घटनेनंतर प्रशासनाला आली जाग.. -आता कोईदूळ नाल्यावरील पुलाचा प्रश्न मार्गी लागणार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील कोईदूळ गावातील रहिवासी छाया सुरेश नैताम वय २६ वर्षे यांना आज,शुक्रवार २८ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास प्रसूती कळा सुरू...

सोशल मीडियावर जातीवाचक वक्तव्य करणे कराळे मास्तरला चांगलेच भोवले; अटक करून कारागृहात रवानगी..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-वर्ध्यातील 'फिनिक्स अकॅडमी'चे संचालक, सामाजिक कार्यकर्ते तथा सोशल मीडिया इन्फ्लुएंसर असलेले कराळे मास्तर यांना सोशल मीडियावर एका विशिष्ट समाजाविषयी जातीवाचक वक्तव्य...

आता मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची जबाबदारी नेमकी कोणाकडे? -तसेही “सरपंच-प्रशासक” बिन पगारी अन् फुल्ल अधिकारीच..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शासनाने गावगाडा हाकणाऱ्या पदाधिकाऱ्यांना मोठा दिलासा देत शनिवार २१ फेब्रुवारी २०२६ रोजी महाराष्ट्र राज्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली वा...

राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या अंगरक्षकावर महिलेचा लैंगिक शोषणाचा आरोप; पोलिसांत गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याचे वित्त व नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधि व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या ३८ वर्षीय अंगरक्षकाने(पोलीस कर्मचारी)एका विवाहित...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!