- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-अवैधरीत्या दारूची वाहतूक करणाऱ्या एका इसमास लाखांदूर पोलिसांनी आज,मंगळवार २४ फेब्रुवारीला दुपारच्या सुमारास दुचाकीसह देशी दारूच्या साठ्यासह ९४ हजाराचा मुद्दल जप्त करून नरेश शंकर गभणे वय ४५ वर्षे,रा.धामणी,जि.भंडारा याचेविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई ही लाखांदूर पोलीस स्टेशन हद्दीतील विरली(बुज)परिसरात करण्यात आली.
लाखांदूर पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन पंचांसह विरली बु.येथील आंबेडकर चौक परिसरात दुपारच्या सुमारास सापळा रचला.दरम्यान,संशयित इसम विना क्रमांकाच्या हिरो एच.एफ.डिलक्स दुचाकीने येतांना दिसला.पोलिसांनी त्यास थांबवून विचारपूस केली असता,त्याच्या हालचाली संशयास्पद असल्याचे दिसून आले.लागलीच पोलिसांनी दुचाकीवर ठेवलेल्या कापडी पिशवीची झडती घेतली असता,त्यात ‘टायगर ब्रँड’च्या देशी दारूच्या ९० मिलीच्या १०० सीलबंद बाटल्या,ज्याची किंमत ४ हजार रुपये व दुचाकी जीची किंमत ९० हजार रुपये असा एकूण ९४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरची कारवाई पोलीस हवालदार संतोष चव्हाण, पोलीस शिपाई ओंकार सपाटे यांनी केली.
- Advertisement -

