Saturday, August 1, 2026
Homeचंद्रपूरअल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण; शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल...

अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण; शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-उन्हाळ्याच्या सुट्टीत अतिरिक्त वर्ग घेण्याच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या तक्रारीवरून काल,मंगळवार,१ ऑक्टोंबरच्या रात्री नऊ वाजताच्या सुमारास कोरपना तालुक्यात शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अमोल लोडे असे त्या शिक्षकाचे नाव आहे.हा शिक्षक कोरपना शहर युवक काँग्रेसचा अध्यक्ष असल्याची माहिती आहे.
अमोल लोडे हा कोरपना येथील एका खासगी शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे.उन्हाळ्यात तो अतिरिक्त वर्ग घेण्याच्या कारणाने विद्यार्थ्यांना शाळेत बोलवत होता.यातच त्याने एक अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केले.मात्र,भीतीपोटी त्या मुलीने ही बाब कुणालाही सांगितली नाही.दरम्यान,काल,मंगळवारी तिच्या कुटुंबीयांना याबाबतची माहिती मिळताच त्यांनी कोरपना शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली.पीडिताच्या तक्रारीवरून आरोपी अमोल लोडे याच्यावर कलम ३७६ पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लैंगिक अत्याचार केल्यानंतर शिक्षक लोडे यांनी पीडित विद्यार्थिनीला ही बाब कुणालाही सांगितली तर तुझ्या आई-वडिलांना जीवानिशी ठार करण्याची धमकी दिली.त्यामुळे पीडिताने घाबरून ही माहिती कुणालाही दिली नाही.दोन दिवसांपूर्वी कुटुंबीयांना याबाबत माहिती मिळाली.त्यांनी पीडिताला विचारले असता तिथे आपबीती कथन केली.त्यानंतर त्यांनी पोलिस ठाणे गाठून तक्रार केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सामाजिक वनीकरण विभागाचा विभागीय वन अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  बीड :-तक्रारदारास तंबी देऊन तब्बल ४५ लाख रुपयांची लाच स्वीकारतांना बीड जिल्ह्याच्या सामाजिक वनीकरण विभागाच्या विभागीय वन अधिकाऱ्यास(DFO)छत्रपती संभाजीनगरच्या लाच लुचपत प्रतिबंधक...

क्रिकेटपटू तरुणीने उचलले टोकाचे पाऊल; गळफास घेऊन संपवले जीवन..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-क्रिकेटच्या मैदानावर मोठे नाव कमावण्याची स्वप्ने उराशी बाळगणाऱ्या एका १७ वर्षीय क्रिकेटपटू तरुणीने गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना नागपूरच्या बजाजनगर पोलिस...

नव्या परिस्थितीनुसार आपत्ती व्यवस्थापनाची कार्यपद्धती विकसित करण्याची गरज.. -नदीकाठील नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्या-सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-बदलत्या हवामानामुळे अल्प कालावधीत अतिवृष्टी होऊन पूरस्थिती निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनाची पूर्वतयारी अधिक सक्षम करण्यावर भर देण्याचे निर्देश सहपालकमंत्री...

जिल्हा परिषदांसह मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बार एकाचवेळी होण्याची शक्यता..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील ५० टक्के ओबीसी आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या तब्बल २२ जिल्हा परिषदांच्या निवडणूका अद्यापही रखडल्या आहेत.विशेष म्हणजे,ज्या ठिकाणी मर्यादा ओलांडल्या गेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!