Thursday, July 30, 2026
Homeभंडाराअन् वाघोबा म्हणाला "थांबा अगोदर मला जाऊ द्या; नाहीतर गाठ माझ्याशी आहे"..!...

अन् वाघोबा म्हणाला “थांबा अगोदर मला जाऊ द्या; नाहीतर गाठ माझ्याशी आहे”..! – समोरासमोर वाघाच्या एंट्रीने घाबरगुंडी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-पूर्वी वाघ पाहण्यासाठी जंगल हुडकून  काढावे लागत होते.पण,हाल्या-हाल्या वाघाचे दर्शन होत नव्हते. दर्शनासाठी व्याघ्र प्रकल्पात गेल्याशिवाय  पर्याय नव्हता. मात्र,काही वर्षांपासून अनेकांना वाघ, बिबट्या,अस्वल व अन्य प्राण्यांचे दर्शन सहजरीत्या होऊ लागले आहे. अश्याच प्रकारे काल शनिवारी जंगलात नाही तर आवागमन करणाऱ्या मुख्य मार्गावरच दुचाकीस्वार तरुणांच्या पुढे थेट वाघाची एंट्री झाली.भल्या मोठ्या वाघाला पाहून तीन तरुणांची काहीकाळ घाबरगुंडी झाली.तिन्ही तरुण दुचाकी घेऊन मागे सरकले आणि दूरवर जाऊन वाघ कुठे जातोय ते बघू लागले.थोड्या वेळातच वाघ जंगलाच्या दिशेने जात “थांबा अगोदर मला जाऊ द्या; नाहीतर गाठ माझ्याशी आहे” असे म्हणाला तर नसावा ना.! सदरची घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील किटाडी-अड्याळ मुख्य मार्गावरील किटाडी परिसरालगत काल,शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास घडली.किटाडी गावातील तरुण दिलेश सेलोटे,आशिष चौधरी व रोशन मराठे हे तिघेही तरुण किटाडी-अड्याळ मुख्य मार्गावरून दुचाकीने प्रवास करीत होते.किटाडी नजिक परिसरात ऐन मार्गावरच भला मोठा पट्टेदार वाघ पुढे आला.यामुळे तिघांचीही घाबरगुंडी झाली.थोड्या वेळातच वाघ जंगलाच्या दिशेने निघून गेला.मात्र, काहीकाळ मार्गावरील रहदारी प्रभावित झाली होती.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

रेल्वेच्या धडकेत दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-रेल्वेच्या धडकेत दोन सख्ख्या भावांचा  दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागपूर जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील मालेगाव टाऊन परिसरात आज,गुरुवार ३० जुलै रोजी सकाळच्या...

आज गडचिरोली जिल्ह्यातील पुरामुळे २५ मार्ग बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नुकतेच दोन दिवसांपूर्वी नागपूरच्या  प्रादेशिक हवामान खात्याने गडचिरोली जिल्ह्यासाठी काल,बुधवार २९ जुलै रोजी रेड अलर्ट,तर आज गुरुवारसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला होता. त्यानुसार,जिल्ह्याच्या...

लाखो रुपयांचा विदेशी दारूसाठा जप्त; कार ठेवून पळाला आरोपी..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अवैधरीत्या दारूची वाहतूक करणाऱ्या कारचा पाठलाग करण्यात आला.दरम्यान,चालकाने पोलिसांना चकमा देण्याचा प्रयत्न केला खरी,पण त्याचा प्रयत्न...

ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी; …अन्यथा एसटी बसची मिळणारी सवलत होणार बंद..!

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड(NCMC)अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानुसार,येत्या शनिवार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!