Sunday, July 12, 2026
Homeदेसाईगंजअडीच वर्षात थापा मारल्या आणि निवडणूक येताच लाडकी बहिण योजना आणली- प्रियंका...

अडीच वर्षात थापा मारल्या आणि निवडणूक येताच लाडकी बहिण योजना आणली- प्रियंका गांधी – देसाईगंज नगरीत प्रियंका गांधी यांची प्रचार सभा संपन्न; लाखोच्यावर पाखरा सारखे लोकं…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज शहरात आज,रविवार १७ नोव्हेंबरला दुपारी १.४५ वाजताच्या सुमारास काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांचे आगमन झाले.प्रियंका गांधी ह्या आज आरमोरी विधानसभा मदारसंघाचे उमेदवार रामदास मसराम तसेच गडचिरोली विधानसभा मतदासंघाचे उमेदवार मनोहर पोरटी यांच्या प्रचारार्थ देसाईगंज नगरीत आल्या होत्या.प्रियंका गांधी यांचे आगमन होताच जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखोच्यावर लोकांनी हातवारे करून प्रचार सभेचा उत्साह द्विगुणित केला.प्रचार सभेच्या सुरुवातीला राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार सह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बिरसा मुंडा यांची प्रतिमा असलेली कलाकुसरीची वास्तू भेट देत प्रियंका गांधी यांचे स्वागत करून प्रचार सभेस सुरुवात करण्यात आली.
सभेदरम्यान राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की,आजची सभा ही इतिहास घडविणारी सभा आहे.यापूर्वी एवढी जनसंख्या कधीही बघतली नसल्याने महायुतीच्या महापापाला नष्ट करण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्र आलो आहोत.महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे.खोकेबाज ५० खोके एकदम ओके अन् माजले बोके,दीड हजारात काय होते?तेल महाग,डाळ महाग,एका खिशात टाकायचे अन् दुसरीकडून न्यायचे असे महायुतीच्या सरकारचे फंडे चालू आहेत.त्यामुळे अशांना धडा शिकविणे आवश्यक आहे.असे ते बोलत होते.
प्रसंगी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका यांनीही विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला.त्या म्हणाल्या, आपला देश हा थोर महात्मे,थोर पुरुष तसेच थोर संतांची महान भूमी आहे.आपल्या देशाची राजनीतीतील एकजुटता ही संविधानामुळेच असल्याने हे संविधनामुळेच सर्वकाही शक्य झाले आहे.महायुती सरकार हे महाराष्ट्र राज्यावर नेहमीच अन्याय करीत आहे.राज्यातील सर्व उद्योगधंदे बाहेर गेलेत.६ हजार पेक्षा कंपन्या बाहेर नेण्यात आल्या.केवळ नारे लावणे त्यांचे कार्य आहे.त्यांच्याकडे एकच सेफ आहे व बाकी अनसेफ,सेफ म्हणजे सुरक्षित.केवळ एकच व्यक्ती सुरक्षित ते म्हणजे अदाणी.असा घणाघात प्रियंका गांधी यांनी केला.
पुढे म्हणाल्या,जी गॅरंटी आम्ही दिली ती पूर्ण केली.आम्ही म्हणतो ते करतो.महायुती सरकार धर्म,जातीवर काहीही बोलत असतात आणि जनतेची दिशाभूल करीत असतात.जनतेचे लक्ष भटकविण्याची नुसती चर्चा केली जाते.सर्वात जास्त संघर्ष महिला करतात.१० वर्षात महागाई किती वाढली.महागाईने कंबरडे मोडले आहे.प्रत्येक बाबींवर जी एस टी लावण्यात आली.रोजगाराची कमतरता,कंत्राटी पद्धतीने कर्मचारी नियुक्ती करण्यात येत आहे.सर्वात जास्त आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत.निवडणूक येतातच ४ महिन्यांपूर्वीच लाडकी बहिण योजना आणली.अडीच वर्षात काय केले? काहीच केले नाहीत नुसत्या थापा व चार महिन्यात लाडकी बहिण योजना मत खरेदी करण्यासाठी आणली आहे.शेतकऱ्यांची कर्जमाफी अजूनही केली नाही.सर्व बाबींवर जी एस टी लादण्यात आली आहे.शेत्या बळकावू लागले आहेत.आदिवासींची परंपरा सर्वोपरी आहे.जल,जंगल आणि जमीन सुरक्षित नाही.गडचिरोली जिल्ह्यात रुग्ण सेवेचे भयावह चित्र आहे.रुग्ण वाहिकेअभावी एका कुटुंबीयांना आपल्या मुलांना खांद्यावर घेऊन १५ किलोमिटर पायपीट करावी लागली.अशी अवस्था गडचिरोली जिल्ह्यातील रुग्णांची आहे.रस्ते बरोबर नाही,शाळा बरोबर नाहीत,रुग्णालय बरोबर नाही.बंगाली बंधूंच्या विविध समस्या आहेत.पुढे जाण्याऐवजी मागे जाऊन रहीलोत.देशातील प्रत्येक जनता-जनार्दन यांना न्याय मिळणे आवश्यक आहे.जाती जनगणना आम्ही करू, मोदीजींना आम्ही सांगू इच्छितो की,तुम्ही जाती जनगणना करून दाखवा.जाती जनगणना तर हे करणार नाहीत.महिलांनो तुम्ही स्वतःला कमजोर समजू नका,आमची सरकार येताच महाविकास आघाडीतर्फे ५ गॅरंटी आम्ही दिली आहे.प्रत्त्येक महिलांना ३ हजार देऊ.नियमित कर्ज,कापसास ७ हजार भाव, बेरोजगार युवकांसाठी भरती प्रक्रिया राबवू,बेरोजगार युवकांना ४ हजार महिना भत्ता,महायुती सरकारच्या भुल थापांना बळी पडू नका,सर्वांच्या समस्या सोडविण्यासाठी काँग्रेस पक्षाला निवडून द्या.ही संविधानाची निवडणूक आहे.असे मत प्रियंका गांधी यांनी व्यक्त केले.
प्रचार सभेप्रसंगी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष
नाना पटोले,छत्तीसगढचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल,गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार नामदेव किरसान,उबाठाचे जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल,काँग्रेस कमिटीचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे,समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष इलियास खान,अमोल मारकवार,रोहिदास राऊत,डॉ.महेश कोपुलवार,मनोहर पोरेटी,आशिष कोरेटी,महाविकास आघाडीचे नेते,पदाधिकारी,कार्यकर्ते व लाखोच्यावर पाखरा सारखे लोकं इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघाच्या हल्ल्यात गुराखी गंभीर जखमी; वाघाची पाठीमागून झडप..

उद्रेक न्युज वृत्त  नागभीड(चंद्रपूर):-गावाजवळच्या परिसरात गुरे चारण्यासाठी गेलेल्या एका गुराख्यावर वाघाने प्राणघातक हल्ला चढवून गुराख्यास गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना आज,रविवार १२ जुलै रोजी दुपारी...

आता कळलेय भावा? अवैध दारू बंद कां होत नाही तर.. – दारू पुरवठा करणाऱ्यांना मिळतोय ठेका; वाचा संपूर्ण करून कहाणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून दारू बंदीचा धिंडोरा पिटण्यात येत आहे.पण, खरोखरच दारू बंद झाली काय?आज कित्येक गावांमध्ये देशी,विदेशी, गावठी मोहफुलाची दारू व थंडगार...

प्रशासकांच्या आर्थिक अधिकारांवर मर्यादा; ग्रामीण अर्थचक्र मंदावले.. – ग्रामपंचायत निवडणुका पुढल्याच वर्षी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींचा कारभार सुरळीत चालवा,यासाठी सरकारने माजी सरपंच आणि सदस्य यांची प्रशासकीय समिती म्हणून नेमणूक केली आहे.त्यानुसार,माजी सरपंच...

३० वर्षीय तरुणाच्या कमरेत आढळली पिस्तूल; तर पॅन्टच्या खिशात आढळल्या पाच गोळ्या..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत एका ३० वर्षीय तरुणास अवैध शत्र बाळगल्या प्रकरणी अटक करून त्याच्याकडील पिस्तूल व पाच...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!