Sunday, October 11, 2026
Homeदेसाईगंजअज्ञात तरुणाचा रेल्वेने कटून मृत्यू; देसाईगंज शहरातील घटना..

अज्ञात तरुणाचा रेल्वेने कटून मृत्यू; देसाईगंज शहरातील घटना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-एका अज्ञात तरुणाचा रेल्वेने कटून मृत्यू झाल्याची घटना आज,रविवार ११ ऑक्टोंबर रोजी सकाळच्या सुमारास देसाईगंज शहराच्या अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या गोंदिया मार्गे तुकुम परिसरातील रेल्वे रुळावर उघडकीस आली.घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून आज सकाळच्या सुमारास शहरातील काही नागरिकांना एक अज्ञात इसम देसाईगंज-गोंदिया मार्गावरील रेल्वे रुळावर पडून असल्याचा दिसून आला.काहींनी जवळ जाऊन पाहिले असता शरीराचा अर्धा भाग दुसरीकडे,तर अर्धा भाग रेल्वे रुळावर असल्याचे निदर्शनास आले.दरम्यान, घटनेची माहिती तात्काळ देसाईगंज रेल्वे प्रशासनास देण्यात आली. रेल्वे प्रशासनाने तातडीने घटनास्थळ गाठून पंचनामा केला व पुढील तपास सुरू केला आहे. मृतक तरुणाची अद्याप ओळख पटलेली नसून कुणाच्या ओळखीचा असल्यास देसाईगंज पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आणखी एका शेतकऱ्याने तलावात उडी घेत संपवले जीवन..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नुकतेच भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील धोप येथील ५३ वर्षीय शेतकरी राजेंद्र अमर सपाटे यांनी गुरुवार ८ ऑक्टोंबर रोजी सकाळी विहिरीत उडी...

बदमाश जावयाने सासऱ्याच्या छातीमध्ये भोसकला चाकू; छातीमध्ये रूतलेल्या चाकूसह गाठले रुग्णालय..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.एका ३५ वर्षीय पुतणजावयाने सासऱ्यावर जीवघेणा चाकू हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना...

आजपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात; श्रद्धेसोबत जीवाची काळजी घेणे आवश्यक..

उद्रेक न्युज वृत्त :-आज,रविवार ११ ऑक्टोंबरपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे.नवरात्रीच्या दिवसांत अनेक भाविक उपवास करतात.धार्मिक श्रद्धेपोटी पायात चप्पल न घालता अनवाणी चालण्याची प्रथा अनेक...

चेक बाऊन्स प्रकरणी कर्जदाराला सहा महिन्याचा कारावास..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-कित्येकदा अनेकजण राष्ट्रीयकृत बँका वा इतर पतसंस्थांकडून कर्ज उचलून त्यांची परतफेड करण्याचे टाळत असतात.त्यातच,काहीजण बँकेच्या खात्यात रक्कम नसतांनाही चेक देऊन परतफेडीचा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!