उद्रेक न्युज वृत्त
नवी दिल्ली :- अखेर नरेंद्र मोदींच्या शपथविधीची तारीख जाहीर झाली असून उद्या म्हणजेच ९ जून रोजी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत.दरम्यान त्याच पार्श्वभूमीवर दिल्लीत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.तसेच दिल्लीत उद्या नो फ्याय झोन(उडाण प्रतिबंधित क्षेत्र)देखील घोषित करण्यात आला आहे.अनेक दिग्गज नेते मंडळी मोदींच्या शपथविधीसाठी हजेरी लावणार आहेत.दरम्यान त्याच पार्श्वभूमिवर दिल्लीत कलम १४४ लागू करण्यात आले आहे.नरेंद्र मोदींच्या शपथविधीच्या पार्श्वभूमिवर जोरदार तयारी करण्यात आली असून,चोख पोलिस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला आहे.

