Tuesday, August 11, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तसुजल्यावर कळतंय; शरद पवारांनी मारलंय कुठं..!-बॅनरची राज्याच्या राजकीय वर्तुळात खमंग चर्चा..

सुजल्यावर कळतंय; शरद पवारांनी मारलंय कुठं..!-बॅनरची राज्याच्या राजकीय वर्तुळात खमंग चर्चा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापुरात एक बॅनर लावून महायुतीच्या कार्यकर्त्यांचा चिमटा काढला आहे.राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापूरच्या दाभोळकर चौकात एक बॅनर लावले आहे.या बॅनरवर त्यांनी सुजल्यावर कळतंय; शरद पवारांनी मारलंय कुठं..! असा एका ओळीचा मजकूर लिहिला आहे.या बॅनरवर शरद पवारांचा फोटो व तुतारी वाजवणारा माणूस या त्यांच्या पक्षचिन्हही आहे.शुक्रवारी रात्री हे बॅनर लागल्यानंतर त्याचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झालेत.या बॅनरची राज्याच्या राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली आहे.राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापुरात हे बॅनर लावले आहे.या बॅनरवरील एका ओळीतून शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला दाखवलेल्या अस्मानाची प्रचिती येत असल्याचा दावा व्हायरल पोस्टमध्ये केला जात आहे.

महाराष्ट्राच नव्हे तर देशाच्या राजकारणात शरद पवार यांना तेल लावलेला पैलवान म्हटले जाते.विपरित परिस्थितीतही ते आपल्या राजकीय विरोधकांना अस्मान दाखवून ते आपल्या राजकीय चाणाक्षतेची चुणूक दाखवतात.त्यांच्या राजकीय चातुर्याची अनेक उदाहरणे दिसून येतात. त्यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या सरकारचा यशस्वी प्रयोग राबवून दाखवला.पण शिवसेनेतील फुटीनंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील हे सरकार पडले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अचानक विजांचा लखलखाट; विज कोसळून महिलेचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील मऱ्हेगाव येथील राजुली जंगल परिसरात गुरे चारण्यासाठी गेलेल्या उत्तरा उत्तम थेर वय ४७ वर्षे या महिला गुराखीचा वीज कोसळून...

सर्पदंशग्रस्त चिमुकलीला नागपूरला हलविले..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंश झालेल्या कुमारी दीपिका बिलकुरासाय मडावी वय ११ वर्षे हिला पुढील उपचारासाठी जिल्हा प्रशासनाने...

दुःखद घटना..! तीन शालेय विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू; तर अन्य तीन विद्यार्थिनींवर उपचार सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे.या घटनेची प्रशासनाने गंभीर दखल...

आरमोरी येथे आरपीआयची बैठक संपन्न; विविध विषयांवर विचारमंथन..

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आरपीआय)च्या वतीने आरमोरी येथील विश्राम गृहात नुकतीच पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.या बैठकीत पक्ष संघटन मजबूत करण्यासह विविध सामाजिक,राजकीय...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!