Wednesday, September 30, 2026
Homeभंडाराअखेर दोघांचा बळी घेणारी नरभक्षक वाघिण जेरबंद..

अखेर दोघांचा बळी घेणारी नरभक्षक वाघिण जेरबंद..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात दोघांचा बळी घेणारी व दोघांना जखमी करणारी टी-२७ नरभक्षक वाघीण जेरबंद करण्यास वनविभागास यश आले आहे.आज,रविवार २८ जून रोजी सकाळच्या सुमारास उमरझरी परिसरातील उसाच्या शेतात एका शेळीची शिकार केल्यानंतर वाघीण त्या परिसरात असल्याची माहिती वनविभागाला मिळताच नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प,गोंदिया व भंडारा वनविभागाच्या रॅपिड रिस्पॉन्स टीम तसेच वन विकास महामंडळाच्या
वनकर्मचाऱ्यांनी संयुक्तरीत्या राबविलेल्या मोहिमेत तिला यशस्वीरीत्या जेरबंद करण्यात आले.
विशेष म्हणजे,नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रांतर्गत येणाऱ्या पिटेझरी वनपरिक्षेत्रात या वाघिणीने मानवी वस्तीत प्रचंड धुमाकूळ घातला होता.वाघिणीने आतापर्यंत दोन जणांचा बळी घेतला,तर दोघांना जखमी केले होते.गुरुवार १९ मार्च २०२६ रोजी दुपारच्या सुमारास भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील बाम्पेवाडा वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या उमरझरी-बाम्पेवाडा जंगल परिसरात मोहफुले वेचण्यासाठी शेतशिवारात गेलेल्या वसंत गणपत मेश्राम वय ५० वर्षे,रा.बाम्पेवाडा, ता.साकोली यांना ठार केले होते.तसेच,शनिवार,२८ मार्च २०२६ रोजी सकाळी दहा वाजेच्या दरम्यान साकोली तालुक्याच्या उमरझरी शेतशिवारात मिरची तोडत असलेल्या शेतकरी महिलेवर हल्ला चढवून गंभीर जखमी केले होते.मात्र,पाच दिवसांच्या उपचारानंतर माया रामकृष्ण सोनवाने वय ४८ वर्षे,रा.उमरझरी,ता.साकोली, जि.भंडारा यांचा मृत्यू झाला होता.यासह १ एप्रिल २०२६ रोजी साकोली तालुक्यातील आमगाव(बुज)येथील छाया सुधाकर मुंगमोडे वय ४३ वर्षे या महिलेवर वाघिणीने हल्ला करून गंभीर जखमी केले होते.शेतामध्ये सरपण गोळा करत असतांना ही घटना घडली होती.त्यानंतरही, नुकतेच २४ जून २०२५ रोजी आमगाव येथील हरिश्चंद्र मडावी यांच्यावर केलेल्या हल्ल्यामुळे  वाघिणीची दहशत अधिकच पसरली होती.त्यामुळे वन विभाग ॲक्शन मोडवर आले होते.अखेर आज वाघिणीला पकडण्यात आले.वाघिणीला पकडल्याने अनेक दिवसांपासून भीती व दहशतीच्या छायेखाली असणाऱ्या परिसरातील ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्यापासून बस प्रवासासाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमधून सवलतीचा प्रवास करण्यासाठी महामंडळाने 'एनसीएमसी' कार्ड अनिवार्य केले आहे.प्रवाशांना नानाविध सुविधा उपलब्ध करवून देण्यासाठी राज्य मार्ग...

अवैध रेतीची वाहतूक; दोन हायवा ट्रक जप्त..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या जुनोना परिसरात अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या दोन हायवा ट्रकवर पोलिसांनी धडक कारवाई केली.या कारवाईत हायवा चालक सुमित संतोष टेंभूर्णे वय...

अखेर जिल्हा व स्थानिक प्रशासनाच्या सजगतेने प्रलयकारी पुरावर मात..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-२५ ते २८ सप्टेंबर दरम्यान इंद्रावती उपखोऱ्यात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड परिसराला गेले चार दिवस भीषण पुराचा वेढा पडला...

मंत्रिमंडळ बैठकीतील दहा मोठे निर्णय; माजी अग्निवीरांसाठी शासकीय नोकरीत आरक्षण..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य मंत्री मंडळाची बैठक आज,मंगळवार २९ सप्टेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडलेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!