- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-चंद्रपूर वन विभागातील कोठारी वनपरिक्षेत्रात कार्यरत वनरक्षक शशिकांत घरझाडे वय २७ वर्षे यांनी किरायाच्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना काल,सोमवारी १६ सप्टेंबरच्या दुपारी चार वाजताच्या सुमारास घडली.
शशिकांत घरझाडे हे वनरक्षक पदावर मागील चार वर्षांपासून कार्यरत होते.कोठारी क्षेत्रातील झरण मध्यवर्ती रोपवटिकेची जबाबदारी त्यांच्यावर होती. मात्र,मागील काही महिन्यांपासून ते वैद्यकीय रजेवर होते.दरम्यान,अनियमित कार्यप्रणालीमुळे त्यांच्याकडून रोपवटिकेचा कार्यभार काढण्यात आला होता.विशेष म्हणजे,दारूच्या व्यसनामुळे पत्नी मुलीला घेऊन गावी निघून गेली होती.सोमवारी सकाळी वैद्यकीय मंडळाकडून वैद्यकीय तपासणी करण्याचे पत्र देण्यासाठी त्याचा सहकारी घरी गेला होता.त्यानंतर पुन्हा दुपारी चार वाजताच्या सुमारास सहकारी त्याच्या घरी गेला असता,दार बंद होते. त्यानंतर खिडकीतून डोकावून बघितल्यानंतर त्याचा मृतदेह पंख्याला लटकलेला दिसला.
घटनेची माहिती कोठारी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बल्लारपूर येथे पाठविला.घटनेचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक योगेश खरसान करीत आहेत.
- Advertisement -

