Saturday, June 27, 2026
Homeगडचिरोलीहत्तींमुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला; धानपिकांची प्रचंड नासधूस

हत्तींमुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला; धानपिकांची प्रचंड नासधूस

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-आरमोरी वन परिक्षेत्रांतर्गत पळसगाव उपवनक्षेत्रातील कराडी शेतात रविवारी रात्रीच्या सुमारास जंगली हत्तीच्या कळपाने उच्छाद घालित धानपिकांची प्रचंड नासाडी केली आहे.यामध्ये बालाजी महादेव रामटेके व मनोहर सदाशिव राऊत या दोन शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.पीक डौलात आले असताना हत्तींनी ते भूईसपाट केल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.
गेल्या आठवडाभरापासून कुरखेडा वनपरिक्षेत्रातील शेतशिवारात धुमाकूळ घालणाऱ्या जंगली हत्तीच्या कळपाने मार्गक्रमण करीत आता आरमोरी वनपरिक्षेत्रात धडक दिली आहे.या वनपरिक्षेत्रातील पाटणवाडा व वैरागड परिसरात संचारत असताना त्यांनी येथील धानपिकांची प्रचंड नासधूस केली होती. दरम्यान रविवारी,रात्रीच्या सुमाराला हत्तींनी पळसगाव उपवनक्षेत्र हद्दीतील कराडी जंगलात मार्गक्रमण करीत थेट शेतशिवारात धानपिकांची नासधूस केली.यात दोन शेतकऱ्यांचे उभे धानपिक पूर्णतः नेस्तनाबूत झाले.सोमवारी सकाळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठित पंचनामा केला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्याला पल्स पोलिओ लसीकरण मोहीम.. -२ हजार ३०८ लसीकरण केंद्रे,१२३ ट्रान्झिट व ९८ मोबाईल पथके सज्ज..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये,या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत उद्या,रविवार २८ जून २०२६ रोजी संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रीय...

मी काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे; पदासाठी किंवा सत्तेसाठी विचारांशी तडजोड करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.. – विजय वडेट्टीवारांनी शिंदे सेनेतील प्रवेशाचे वृत्त फेटाळले..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नुकतेच उद्धव ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली.खासदारांच्या पक्षप्रवेशामुळे केंद्रात शिंदे गटाचे वजन वाढले...

गडचिरोली शहरात मुला-मुलींचे प्रत्येकी २५० विद्यार्थ्यांची क्षमता असलेली दोन स्वतंत्र शासकीय वसतिगृहे मंजूर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुर्गम,आदिवासी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जिल्हा मुख्यालयी राहून उच्च शिक्षण घेण्यासाठी सुरक्षित,दर्जेदार आणि सर्व सोयी-सुविधांनी युक्त निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या...

विजांच्या कडकडाटासह पाऊस; अंगावर वीज कोसळून दोघांचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात आज,शुक्रवार २६ जून रोजी विविध भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली.मात्र,विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे काही तालुक्यात वीज कोसळून दुर्घटना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!