- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज येथील युनिव्हर्सल कॉन्व्हेंट तथा डेव्हिडकीर्ती इंटरनॅशनल पब्लिक स्कूलची शिक्षक-पालक सभा काल,१४ सप्टेंबर रोजी संपन्न झाली असून सदर सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक पडवेकर तसेच मुख्याध्यापक पंकज मेश्राम,मुख्यध्यापिका विशाखा ठवरे,प्रमुख पाहुणे म्हणून संदीप बुद्धे,नाकाडे सह पालकवर्ग उपस्थित होते.
शिक्षक-पालक सभेमध्ये प्रथम घटक चाचणी,तसेच या सत्रात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली. विध्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कशा प्रकारे साधता येईल याबद्दल मुख्याध्यापक यांनी पालकांसोबत चर्चा साधली व पालकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करीत येण्याऱ्या कालावधीत विध्यार्थ्यांचा मनोबल वाढविण्यासाठी स्पर्धामध्ये भाग घ्यावे व यासाठी पालकांनी विध्यार्थ्यांचा मनोबल वाढवावा याबद्दल मार्गदर्शन केले.
पालक प्राधिनिधी म्हणुन आशिष कोसारे यांनी पालकांची बाजू मांडली.शिक्षक त्याचप्रमाणे शाळेची स्तुती करीत आणखी शाळेचा स्तर कसा उंचावू शकतो,याबद्दल मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षद सोनपिपरे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अनिकेत लोणारे यांनी केले.प्रसंगी सर्व शिक्षक वृंद कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
- Advertisement -

