Wednesday, April 15, 2026
Homeभंडारादुचाकीला जोरदार धडक देऊन कारचालक फरार; दोघेजण गंभीर जखमी...

दुचाकीला जोरदार धडक देऊन कारचालक फरार; दोघेजण गंभीर जखमी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-भरधाव कारने पाठीमागून दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरुन जाणारे दोघेही गंभीर जखमी झाल्याची घटना आज,सोमवारी ९ सप्टेंबरला दुपारी १ वाजताच्या सुमारास देव्हाडी रेल्वे उड्डाणपुलावर घडली.अपघातानंतर चारचाकी वाहनाने घटनास्थळावरुन पळ काढला.सुकळी येथील अक्षय मंगरू फेंडर वय २७ वर्षे तसेच त्याची काकी नंदा राजेंद्र फेंडर वय ४२ वर्षे हे तुमसर येथे काही कामानिमित्त दुचाकीने जात होते.यावेळी देव्हाडी उड्डाणपुलावर दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.या धडकेमध्ये दुचाकीवरील दोघेही रस्त्यावर पडले.त्यांच्या हाताला, पायाला व तोंडाला गंभीर इजा झाली.धडक दिल्यानंतर चारचाकी वाहन घटनास्थळावरून खापा मार्गे फरार झाले.अपघातात गंभीर जखमी झालेल्या नंदा व अक्षय यांना परिसरातील नागरिकांनी तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात वाघिणीने धुमाकूळ घालून गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी बाम्पेवाडा येथील ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम यांचा जीव घेतला...

आता प्रत्येक लाभार्थी कुटुंबास मिळणार तीन लिटर रॉकेल..

उद्रेक न्युज वृत्त :-जमाना कितीही बदलला तरीही 'जुनं ते सोनं' अशी अवस्था केवळ आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्याच्या विविध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!