- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
वरोरा(चंद्रपूर):-वाढदिवसाची पार्टी देतो म्हणून दोन शिक्षकांनी अल्पवयीन मुलीला खोलीवर बोलावून तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना २६ ऑगस्टच्या सोमवारी वरोरा शहरात उघडकीस आली आहे.याप्रकरणी पोलिसांनी गुरुवारी विनयभंग व पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल केला असून दोघेही शिक्षक पसार झाले आहेत.या घटनेमुळे गुरू-शिष्यांच्या नात्याला काळिमा फासला गेला आहे. धंनजय रामभाऊ पारखे व प्रमोद बालाजी बेलेकर असे आरोपी शिक्षकांची नावे आहेत.या घटनेविरोधात सामाजिक कार्यकर्ते आक्रमक झाल्याने शहरात तणावाची स्थिती निर्माण झालेली आहे.प्रमोद बेलेकर व धनंजय पारके हे दोघेही शहातील नामांकित विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.दोघांनी वाढदिवसानिमित्त पार्टीचा बेत आखला व त्याच विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीला बेलेकर यांनी आपल्या घरी बोलविले.वाढदिवस साजरा केल्यानंतर शिक्षकाने विद्यार्थिनीला चॉकलेट भेट म्हणून दिले.लगेच गुरुजींनी रिटर्न गिफ्ट मागितले.रिटर्न गिफ्टमध्ये आलिंगन(मिठी)मारण्याचा प्रस्ताव विद्यार्थिनी पुढे ठेवण्यात आला.विद्यार्थिनी ते नाकारले तेव्हा गुरुजींनी हात पकडून जबरदस्ती मिठी देण्याचा प्रयत्न केला.धास्तावलेल्या विद्यार्थिनीने घरचा रस्ता पकडला.हा सगळा प्रकार आपल्या आई वडिलांना सांगितला.यासाठी कुणाकडे दाद मागावी; या विवंचनेत असलेल्या पालकांनी एका सामाजिक कार्यकर्त्याच्या मदतीने पोलिस स्टेशन गाठत दोन्ही शिक्षकांविरुद्ध तक्रार नोंदविली.पोलिस अधिकाऱ्यांनी आरोपीविरुद्ध पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल केला.
- Advertisement -

