- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा तालुक्यात गेल्या महिनाभरापासून रानटी हत्तींचा वावर आहे.यामुळे शेतीपिकांची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे.रानटी हत्तींचा कळप सध्या दादापूर डोंगराच्या आश्रयाला आहे.गेल्या आठवडाभरापासून हत्तींचा कळप सायंकाळ झाल्यानंतर दादापूर,वारवी व चिपरी येथील शेतशिवारात धुडगूस घालत आहे.यामुळे पिके पायदळी तुडविली जात आहेत.सोमवारी नुकसानग्रस्त भागात वनाधिकाऱ्यांनी पाहणी केली.
रानटी हत्तींनी दादापूर परिसरातील शेतीपिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस केलेली आहे.या परिसरात मागील अनेक दिवसांपासून ठाण मांडलेला रानटी हत्तींचा कळप दिवसा डोंगराच्या पायथ्याशी दाट जंगलात दडून असतो तर सायंकाळ होताच येथील शेतशिवारात प्रवेश करीत धान पीक पायदळी तुडवितो.सध्या हलके धानपीक गर्भावस्थेत आहेत. याच पिकावर हत्ती ताव मारत आहेत.हत्तींच्या धुडगुसामुळे शेतकरी हतबल व हैराण झाले आहेत.या नुकसानीचे पंचनामे करून लवकर भरपाई द्यावी; अशी मागणी वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याकडे केली आहे.
बालाजी दिघोरे,वनपरिक्षेत्र अधिकारी पुरडा👇
रानटी हत्तींच्या कळपात २२ मोठे तर ६ पिल्ले असे एकूण २८ हत्ती आहेत.हत्तींच्या कळपातील दोन सदस्यांचा विद्युत करंटमुळे मृत्यू झाला.तर दोन हत्ती कळपातून भरकटले आहेत.
- Advertisement -

