Friday, May 1, 2026
Homeगोंदियाशहराच्या मध्यभागी असलेल्या गणेशनगर परिसरात अस्वलाचे दर्शन...

शहराच्या मध्यभागी असलेल्या गणेशनगर परिसरात अस्वलाचे दर्शन…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

गोंदिया :-शहरात काल,शनिवारी पहाटे शहराच्या मध्यभागी असलेल्या गणेशनगर या परिसरातील जुन्या जिल्हा परिषद आणि सध्या प्रधानमंत्री ग्राम सडक योजना यांचे कार्यालय तसेच उपविभागीय सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे कार्यालय आहे.या कार्यालयाच्या परिसरात काल,शनिवारी अचानक पहाटे-पहाटे अस्वल आल्याचे सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांना दिसल्याने एकच खळबळ उडाली.अस्वल आल्याची बातमी वाऱ्यासारखी शहरात पसरली.नागरिकांनी अस्वलाला बघण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली होती.याची माहिती पोलिस व वन विभाग तसेच अग्निशमन विभागाला देण्यात आली.माहिती मिळताच वनविभाग आणि पोलिस पथक दाखल झाले. नागरिकांना त्या परिसरापासून दूर ठेवण्यात आले. अस्वलाला पकडण्याकरीता नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील पथकाला पाचारण करण्यात आले.पथकाने बेशुद्ध करण्याचे इंजेक्शन बंदुकीच्या सहाय्याने दिले.त्यानंतर अस्वल बेशुद्ध झाल्याने पिंजऱ्यात कैद करून वैद्यकीय तपास पूर्ण करून जंगलात सोडून देण्यात आले.तब्बल पाच तासांच्या अथक परिश्रमानंतर पथकाला अस्वलाला बेशुद्ध करून पकडण्यात यश आले.शहरात अस्वल शिरल्यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

हॉटेलचा नाश्ता महागणार; व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ.. – सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.आज,शुक्रवार १ मे रोजी १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत...

उद्याला बारावीचा ऑनलाइन निकाल..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार,याची उत्सुकता असतांनाच राज्य बोर्डाने काल गुरुवारच्या रात्री परिपत्रक काढत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!