Thursday, April 30, 2026
Homeदेसाईगंजवीसोरा येथे भरारी महिला प्रभाग संघाची वार्षीक सर्वसाधारण सभा संपन्न...

वीसोरा येथे भरारी महिला प्रभाग संघाची वार्षीक सर्वसाधारण सभा संपन्न…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या विसोरा येथे आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतीच
विसोरा येथील ग्रामपंचायत सभागृहात “भरारी महिला प्रभाग संघाची वार्षीक सर्वसाधारण सभा” संपन्न झाली.
सर्वसाधारण सभेला संबोधित करताना आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी म्हटले की,’उमेद व महिलांनी सुरु केलेल्या बचत गटाच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या व व्यावसायिक चालना मिळाली आहे.महिलांच्या अनेक कुटुंबातील आर्थिक अडचणी दूर होऊ लागल्या आहेत.आर्थिक
बचत करण्यासोबतच शेतकऱ्यांना व मजुरांना  कमीत कमी टक्के व्याजाने पैसे मिळू लागले आहेत.अशातच अनेक परिवारातील महिला वर्गांना हातभार मिळू लागल्याने आर्थिक व व्यावसायिक विकास झाला आहे.यापुढेही महिलांनी असेच गटांच्या माध्यमातून प्रगती साधत आर्थिकदृष्ट्या सक्षम व व्यावसायिक विकास करावा; असे मार्गदर्शन प्रसंगी आमदार गजबे यांनी केले आहे.आयोजित कार्यक्रम प्रसंगी आमदार कृष्णा गजबे यांचे भरारी महिला प्रभाग संघाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आला.
याप्रसंगी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे,पंचायत समितीचे माजी सभापती शेवंताताई अवसरे, विसोरा ग्रा पं. येथील सरपंच रमेशजी कुथे,गट विकास अधिकारी प्रणालीताई खोचरे,ग्रामसेवक आळे,भरारी महिला प्रभाग संघाच्या अध्यक्षा करिष्मा नागपूरकर,रेखा तुपटे,भरारी महिला प्रभाग संघाच्या सचिव वर्षा कांबळे,पौर्णिमा मेश्राम,तालुका अभियान प्रतिनिधी गजभिये,प्रभाग समन्वयक कपिल देवाळकर,सचिन उपरे,रत्नमाला दिवठे,सविता कुंभरे,नंदा कऱ्हाडे, अस्मिता सांगोळे,शिल्पा कांबळे,तसेच प्रभाग संघाचे सर्व पदाधिकारी व तालुका समूहाचे महिला प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदर कार्यकामाचे प्रास्ताविक कपिल देवाळकर(प्रभाग समन्वयक) यांनी केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर कुरखेडा नगरपंचायत सफाई कामगारांच्या बेमुदत संपावर तोडगा; संप मागे..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा नगरपंचायत अंतर्गत कार्यरत सफाई कामगारांंनी थकीत वेतनाकरीता मागील २३ एप्रीलपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते.त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण...

कायदा हा लवचिक आणि बदलत्या काळाशी सुसंगत असावा- सर्वोच्च न्यायालय – गर्भपाताची परवानगी दिली नाही; तर पीडितेच्या मनावर आयुष्यभर न पुसली जाणारी जखम आणि...

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच २४ एप्रिल २०२६ रोजी न्यायमूर्ती बी.व्ही.नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने एका १५ वर्षीय बलात्कार पिडीत तरुणीला ३० आठवड्यांचा...

बच्चू कडूंनी धनुष्यबाण घेतला हाती; शेतकरी,मजूर,दिव्यांगांसाठी निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दिव्यांग,शेतकरी आणि गोरगरिबांसाठी लढणारा 'रॉबिनहूड' नेता माजी मंत्री तथा प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री...

शहरी भागात क्युआर कोड असलेली विवाह प्रमाणपत्रे द्या.. – देसाईगंज भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत सध्या स्थितीत अनेक शासकीय कागदपत्रे ऑनलाइन आणि सुरक्षित केली जात आहेत.यात विवाह नोंदणी प्रमाणपत्राचाही समावेश आहे.विवाह नोंदणी प्रमाणपत्राला विशेष...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!