- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नवी दिल्ली :-महाराष्ट्रातील आगामी विधानसभेच्या निवडणुका विधानसभेची मुदत संपण्याआधीच होणार आहेत.२६ नोव्हेंबरपूर्वी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल.ऑक्टोंबरमध्ये निवडणुकीची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे.याचे कारण म्हणजे,महाराष्ट्र विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्याचा निवडणूक आयोगाचा कोणताही विचार सध्यातरी नाही.असे केंद्रीय निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे.
निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की,महाराष्ट्र विधानसभेच्या विद्यमान सरकारचा कार्यकाळ २६ नोव्हेंबरला संपत आहे.त्याआधी महाराष्ट्रात निवडणुका होणार आहेत.वेळेत निवडणूका घेणे,ही घटनात्मक सक्ती असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले.यामध्ये कोणतेही बदल करता येणार नाहीत.वास्तविक २६ नोव्हेंबरपर्यंत निवडणुका न झाल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी लागेल.निवडणूक आयोगाने अशी परिस्थिती निर्माण होऊ देण्यास स्पष्ट नकार दिला.निवडणूक आयोगाच्या नकारामुळे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका नोव्हेंबरमध्ये पूर्ण होतील आणि नवे सरकारही निर्धारित वेळेत स्थापन होईल; असे स्पष्ट झाले आहे.
निवडणूक आयोगाने १६ ऑगस्ट रोजी,हरियाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभांच्या निवडणुकीची तारीख जाहीर केली होती.यावेळी आयोगाने महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर केली नाही. हरियाणा विधानसभेचा कार्यकाळ ३ नोव्हेंबरला संपत आहे.महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबरला संपत आहे.अशा स्थितीत महाराष्ट्र आणि झारखंडच्या निवडणुका जम्मू- काश्मीर आणि हरियाणाच्या विधानसभा निवडणुका सोबतच जाहीर होणार का? असा प्रश्न निर्माण झाला होता.मात्र,निवडणूक आयोगाने तसे न करता केवळ हरियाणा आणि जम्मू-काश्मीर निवडणुकांची घोषणा केली.
- Advertisement -

