Wednesday, July 29, 2026
Homeकुरखेडाकुरखेडा तालुक्याच्या चिखली येथील तरुणाच्या हत्येचा झाला उलगडा... - क्षुल्लक कारणावरून केली...

कुरखेडा तालुक्याच्या चिखली येथील तरुणाच्या हत्येचा झाला उलगडा… – क्षुल्लक कारणावरून केली हत्या…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

कुरखेडा(गडचिरोली):-क्षुल्लक कारणावरून तिघा मित्रांनी मिळून कुरखेडा तालुक्याच्या चिखली येथील जितेश पगडवार या २८ वर्षीय तरुणाची हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.शुक्रवारी,९ ऑगस्ट रोजी पहाटे चिखली-वडेगाव मार्गावर जितेश पगडवार तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती.हत्या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवित अवघ्या काही तासांतच गावातीलच तीन तरुणांना अटक केली.मोबाइलच्या क्षुल्लक वादावरून हत्या केल्याची कबुली तिन्ही आरोपींनी कुरखेडा पोलिसांनी दिली.जितू ऊर्फ विशाल पिसोरे वय १९ वर्षे,वैभव सहारे वय १९ वर्षे,अमन पठाण वय २० वर्षे सर्व रा.चिखली अशी अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत.

प्राप्त माहितीनुसार,तिन्ही आरोपी मित्र आहेत.आरोपी जितू ऊर्फ विशाल पिसोरे याचा मोबाइल काही दिवसांपूर्वी हरवला होता.हा मोबाइल जितेशनेच पळविला असेल,अशी आरोपीना शंका होती.यावरून मागील काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू होता. हा वाद विकोपाला गेल्याने वडेगाव रस्त्यावर गुरुवारी,दिनांक-८ ऑगस्टच्या रात्री १०.३० ते ११ वाजताच्या दरम्यान तिघांनीही जितेशच्या डोक्यावर लोखंडी सळाखीने वार करीत त्याची हत्या केली. शुक्रवारी दि.९ ऑगस्ट रोजी सदरची घटना उघडकीस येताच कुरखेडा पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपासाची चक्रे वेगाने फिरवित गावातील जितू,वैभव व अमन यांना त्याच दिवशी चौकशीसाठी ताब्यात घेतले. सुरुवातीला तिघांनीही उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र,पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.त्यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०३ (१), २३८,३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास ठाणेदार महेंद्र वाघ यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तुकाराम मुंढेंनी शाळा व्यवस्थापनावर सोपवली मोठी जबाबदारी; विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी विविध निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या धडक कारवाईचे सत्र सुरू असतांनाच आता अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी...

माझा वाढदिवस-एक झाड उपक्रम; देसाईगंज आदर्श महाविद्यालयाच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा आणि वृक्षारोपणाची सवय प्रत्येकामध्ये रुजावी या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,देसाईगंज येथे "माझा वाढदिवस-एक झाड" हा...

राज्यांतर्गत पिकस्पर्धा; आता शेतकऱ्यांना घरबसल्या अर्ज करण्याची सुविधा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील अन्नधान्य,कडधान्य व गळीतधान्य पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी तसेच प्रयोगशील व प्रगतशील शेतकऱ्यांच्या कार्याचा गौरव करून आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने...

राज्य सरकार म्हणतेय; गौण खनिजांच्या अवैध उत्खनन आणि वाहतुकीवर दहापट दंड आकारू.. -चोर खरोखरच चोऱ्या करणे सोडणार काय?

उद्रेक न्युज वृत्त :-गौण खनिजांची चोरी करणे ही काही चोरट्यांसाठी नित्याचीच बाब झाली आहे.काहींना अवैध रेती,मुरूम,दगड,माती व इतर गौण खनिजांची चोरी केल्याशिवाय चैनच पडेनासे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!