Monday, September 21, 2026
Homeनवी दिल्लीसी.पी.राधाकृष्णन महाराष्ट्र राज्याचे नवे राज्यपाल…

सी.पी.राधाकृष्णन महाराष्ट्र राज्याचे नवे राज्यपाल…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नवी दिल्ली :-सी.पी.राधाकृष्णन यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.तर दुसरकीडे माजी विधानसभा अक्ष्यक्ष आणि भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राधाकृष्णन हे रमेश बैस यांची जागा घेतील.बैस हे १८ फेब्रुवारी २०२३ पासून राज्यपाल होते.मध्यरात्रीनंतर १ वाजता राष्ट्रपती भवनाकडून यासंदर्भातील पत्रक जारी करण्यात आले आहे.परित्रकामध्ये एकूण १० राज्यांमधील राज्यपालांच्या बदल्या तसेच  फेरनियुक्त्या असल्याचे सांगण्यात येत आहे.सदर नियुक्त्या या पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून लागू होणार आहेत.

६७ वर्षीय सी.पी.राधाकृष्णन हे मूळ तामिळनाडूचे आहेत.त्यांचा जन्म ४ मे १९५७ रोजी तिरुपूरमधे झाला.वयाच्या १६ व्या वर्षापासून त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम सुरु केले.कोइमतूर मतदारसंघातून लोकसभेवर राधाकृष्णन दोन वेळा निवडून आले.भाजपचे तामिळनाडू प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले.सी.पी.राधाकृष्णन यांची नियुक्ती अशा वेळी झाली आहे;जेव्हा राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत.राधाकृष्णन यांनी ११९८ आणि १९९९च्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला.२०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीतही भाजपने त्यांना उमेदवारी दिली होती,मात्र,त्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.१८ फेब्रुवारी २०२३ रोजी ते झारखंडचे राज्यपाल झाले होते.आता त्यांची महाराष्ट्र राज्याच्या राज्यपाल पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दत्तक प्रक्रियेत चार बालकांना मिळाले कायदेशीर पालकत्व..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-बाल न्याय(मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम,२०१५ व सुधारित अधिनियम,२०२१ मधील तरतुदींनुसार गडचिरोली जिल्ह्यातील दत्तक प्रक्रियेची चार प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत....

पठ्ठ्याने दिमाक लावला खरी,पण अलगद खाकीच्या जाळ्यात अडकला.. -दारूसाठ्यासह २८ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-चोर कितीही शातिर असला तरीही तो खाकीच्या नजरेतून सुटूच शकत नाही.काही घटना यांस अपवाद असू शकतात.पण,एखाद्या चित्रपटातील स्टाईल ही प्रत्यक्षात खरी...

२२ मिनी सेतू केंद्रचालकांची भरती प्रक्रिया; अंतिम पात्र-अपात्र यादी प्रसिद्ध..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील १३ ‘दादालोरा खिडकी’ आणि ९ ‘आदी सेवा केंद्र’ अशा एकूण २२ केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय व लोकाभिमुख सेवा पुरविण्यासाठी...

राज्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या हालचालींना वेग..

उद्रेक न्युज वृत्त :-यंदा पावसाने दडी मारल्याने महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती उद्भवलेली आहे.अस्मानी संकटामुळे शेतकरी बांधव हवालदिल झाला आहे.राज्यात पावसाने घेतलेली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!