Friday, May 1, 2026
Homeआरमोरीपळसगाव येथील आरोग्य शिबीर संपन्न; तब्बल १३३८ रुग्णांनी शिबिराचा घेतला लाभ…-शिबिरात प्रविण...

पळसगाव येथील आरोग्य शिबीर संपन्न; तब्बल १३३८ रुग्णांनी शिबिराचा घेतला लाभ…-शिबिरात प्रविण रहाटे यांचेसह १२ रक्तदात्यांनी केले रक्तदान…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

आरमोरी(गडचिरोली) :-आरमोरी तालुक्याच्या पळसगाव येथे शेतकरी नेते तथा काँग्रेसचे रामदास मसराम व मित्र परिवारांनी मिळून आयोजित केलेला मोफत आरोग्य तपासणी शिबिर नुकताच संपन्न झाला आहे.सदर आरोग्य शिबिरात पळसगाव, पाथरगोटा,जोगिसाखरा,शंकरनगर,कासवी,आष्टा, अंतर्जी,रामपूर व कनेरी गावातील तब्बल १३३८ रुग्णांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला असून प्रविण रहाटे यांचेसह १२ रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे.शिबिर प्रसंगी मोफत औषधी वाटप,नेत्र उपचार, मोफत चष्मे वाटप व इतर सामान्य रोगांची तपासणी करण्यात आली.

सामाजिक कार्यात नेहमी हिरी-हिरीने भाग घेऊन अनेकांच्या अडचणी,समस्या व गोर-गरीब जनतेची मनात असलेली कळकळ लक्षात घेता; सूचक कल्पनेनुसार शेतकरी नेते रामदास मसराम यांनी शेतकरी बांधव व इतरांसाठी मोफत आरोग्य शिबिरांचे सर्वत्र आयोजन सुरू केले आहे.शेतकरी बांधवांना तसेच इतर सर्वसामान्य नागरिकांना पावसाळ्यात अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवू लागतात.अशातच अनेकजण आरोग्याकडे लक्ष न देता शेतीच्या कामात तसेच इतर कामांमध्ये व्यस्त असतात.त्यामुळे गोर-गरिब नागरिकांना आरोग्याच्या समस्या उद्भवू नये; याकरीता मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले.

पळसगाव येथील झालेल्या आरोग्य शिबिरात ६६५ रुग्णांची नेत्र तपासणी करून त्यांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले.४८५ रुग्णांची सामान्य तपासणी करून त्यांना मोफत औषधी वितरण करण्यात आली.८२ रुग्णांची मधुमेह तपासणी करून त्यांना औषधोपचार पुरविण्यात आला.हृदय रोगाच्या रुग्णांची तपासणी करून १५  रुग्णांना मोफत औषधोपचार तथा पुढिल आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचे मार्गदर्शन तसेच १२ मोतीबिंदु रुग्णांची तपासणी करून त्यांच्या शस्त्रक्रियेची पुढील व्यवस्थेचे मार्गदर्शन करण्यात आले तसेच ३८ रुग्णाची इसिजी, ३६ एल एस स्पाईन,तर ५ रुग्ण मुत्र खड्याचे तपासण्यात आले.याप्रसंगी कॉंग्रेसचे पदाधिकारी प्रविण रहाटे यांचेसह १२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. आरोग्य शिबिराचे आयोजक रामदास मसराम काँग्रेस नेते यांचे सह परसराम टिकले माजी उपसभापति पं. स.देसाईगंज,दिलीप घोडाम जिल्हा उपाध्यक्ष काँ., जयश्रीताई दडमल सरपंच पळसगाव,मंगरु वरखडे उपसरपंच पळसगाव,प्रविण राहाटे पत्रकार,गिताताई घोडामपो.पा.,प्रेमीला मने अंगणवाडी सेविका व तमुस अध्यक्ष,सुशीला आडे.माजी सरपंचा पळसगाव, किर्तीलाल पुराम शा.स.अध्यक्ष,राजकुमार गरफडे माजी शा.स.अध्यक्ष,भास्कर सेलोकर उपध्यक्ष शा.स.,मोतीलाल लिंगायत जोगीसाखरा, आनंदराव राऊत,कल्पनाताई दोनाडकर बचत गट अध्यक्ष, हरीदास बावणे त.मु.स.जोगीसाखरा,सोनुताई गरफडे उपसरपंच पळसगाव,नीलकंठा गोहणे चामोर्शी आदी उपस्थित होते. 

सदर आरोग्य शिबिराला नागपूरच्या सुप्रसिद्ध असलेल्या श्युअरटेक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटच्या तज्ञ डॉक्टरांच्या चमुसह जिल्हा रुग्णालय गडचिरोलीचे तज्ञ डॉक्टर व आरोग्य कर्मचारी तसेच देसाईगंजच्या ग्रामिण रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी सेवा प्रदान केली.सदर आरोग्य शिबिराचे यशस्वीतेसाठी सागर वाढई,स्वप्निल मिसार,जितू चौधरी,प्रमोद पत्रे,परशुराम ठाकरे,लंकेश ढोरे,रेशीम प्रधान,उमाकांत दोनाडकर,अमोल प्रधान,चेतन गेडाम, गोपाल दोनाडकर,शैलेश कुंबरे,शरद वरखडे,कृष्णा दोनाडकर,जयदेव कोसरे,दिनकर कांबळे,गोपाल उरकुडे,ज्ञानेश्वर भोयर,महेंद्र खरकाटे,दुर्वास नाईक यांचेसह युवा कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चक्क चोरट्यांनी खासदारांच्या शेतातील वीज मीटरसह मोटरपंप नेला चोरून.

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात चोरीच्या घटनांनी जोर धरलेला असतांनाच आता थेट लोकप्रतिनिधीही यातून सुटलेले नाहीत.भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांच्या वडिलोपार्जित शेतातून अज्ञात...

तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; चंद्रपूर पोलिस अधीक्षक पदाची सूत्रे आता आयुष नोपानी यांच्याकडे..

उद्रेक न्युज वृत्त :-ऐन महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्यातील तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या(भारतीय पोलीस सेवा)बदल्या करण्यात आल्या आहेत.यात चंद्रपूरचे विद्यमान...

“आपण लोकांची कामे करण्यासाठी बसलो आहोत; अडवणूक करण्यासाठी नाही”.. -सहपालकमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण मॅपिंग करून शासनाने स्वतः त्यांच्या दारात जाऊन गरजेनुसार योजनांचा लाभ द्यावा,अशी भूमिका कृषी राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष...

अखेर कुरखेडा नगरपंचायत सफाई कामगारांच्या बेमुदत संपावर तोडगा; संप मागे..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा नगरपंचायत अंतर्गत कार्यरत सफाई कामगारांंनी थकीत वेतनाकरीता मागील २३ एप्रीलपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते.त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!