Friday, September 25, 2026
Homeगोंदियागळ्यातील ओढणी आटा चक्कीच्या पट्टयाला अडकली अन् मुंडकी झाली धडापासून वेगळी..

गळ्यातील ओढणी आटा चक्कीच्या पट्टयाला अडकली अन् मुंडकी झाली धडापासून वेगळी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

अर्जुनी मोरगाव(गोंदिया) :-गळ्यातील ओढणी आटा चक्कीच्या पट्टयाला अडकल्याने डोके धडापासून वेगळे होऊन महिलेचा मृत्यू झाला.ही घटना नवेगावबांध येथे काल,शुक्रवारी दि.२८ जून रोजी घडली.या घटनेमुळे गावात शोककळा पसरली. नीतू हर्षल उजवणे वय ४६ वर्षे असे मृत महिलेचे नाव आहे.

आझाद चौकात हर्षल उजवणे यांची आटा चक्की आहे.काल,शुक्रवारी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास त्यांच्या पत्नी नीतू नेहमीप्रमाणे आटा चक्कीवर दळण दळत असताना,त्यांच्या गळ्यातील ओढणी आटा चक्कीच्या पट्टयाला अडकली.त्यामुळे त्यांचे डोके आटाचक्कीच्या चाकाला अडकून ते धडापासून वेगळे झाले.त्यामुळे त्यांचा जागीच दुर्दैवी अंत झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.या घटनेने उजवणे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती वाऱ्यासारखी गावात पसरली. त्यामुळे आटा चक्कीसमोरील रस्त्यावर गावातील महिलांनी एकच गर्दी केली होती.hjही माहिती मिळताच येथील ठाणेदार पोलिस निरीक्षक योगिता चाफले आपल्या सहका ऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून शव उत्तरिय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय, नवेगावबांध येथे पाठविले आहे.याप्रकरणी नवेगावबांध पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मुसळधार पावसाचा फटका..! भामरागड-आलापल्ली मार्गावरील वाहतूक बंद; ६३ गावांचा तुटला संपर्क..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या विविध भागात दमदार पावसाने हजेरी लावली आहे.अश्यातच जिल्ह्यातील पर्लकोटा नदीचे पाणी पुलावरून वाहत असल्याने भामरागड-आलापल्ली मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली...

जुनी वडसा येथे झुडपी जंगलातील वनपट्ट्यांबाबत सभापती सचिन खरकाटे यांचे मोलाचे मार्गदर्शन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषद हद्दीतील जुनी वडसा येथील झुडपी जंगल परिसरावर वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या आणि शेती कसत असलेल्या नागरिकांना वनजमिनीचे पट्टे मिळवून देण्यासाठी...

शिधापत्रिकाधारकांनी १५ दिवसांत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांना धान्याचा लाभ नियमितपणे मिळावा आणि शिधापत्रिकेवरील सदस्यांची माहिती अचूक व अद्ययावत राहावी,यासाठी गडचिरोली तालुक्यात ई-केवायसी प्रक्रिया...

“आई-बाबा मी तुमची अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही; मला माफ करा” अशी चिठ्ठी लिहून वकिलाने घेतला गळफास.

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २५ वर्षीय तरुण वकिलाने गळफास घेण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली.त्यात "आई-बाबा मी तुमची अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही,मला माफ करा.माझ्या बहिणीकडे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!