उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली) :- देसाईगंज तालुक्याच्या कसारी येथील ४० वर्षीय इसम गेली सहा दिवसांपासून बेपत्ता आहे.नाजुक बुधाजी नेवारे रा.कसारी/मेंढा,ता.देसाईगंज,जि.गडचिरोली असे बेपत्ता झालेल्या इसमाचे नाव आहे.
सदर ईसम १३ जून रोजी दुपारी २ वाजे कुणालाही न सांगता घरून निघून गेला.कुटुंबीयांनी इकडे-तिकडे शोधाशोध केली.मात्र,कुठेही पत्ता न लागल्याने देसाईगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.इसमाचा रंग काळा-सावळा,उंची ५ फूट ३ इंच असून कुणाला आढळून आल्यास ८३२९४७४२०८,९६०४६५३७१० या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा; शोधून देणाऱ्यास ५००० रुपयांचे बक्षिस देण्यात येईल असे कुटूंबियांनी कळविले आहे.

